उटखेडा, ता.रावेर, जि. जळगाव : येथील रहिवासी कमलबाई यशवंत पाटील व त्यांची मुले अविनाश, अजय, अनिल पाटील यांच्या पुढाकाराने उटखेडा येथे यशवंत देवचंद पाटील यांच्या स्मरणार्थ वातानुकूलित शवपेटी लोकार्पण सोहळा पार पडला.कमलबाई पाटील व हितचिंतक पंडित हरी पाटील यांच्या संकल्पनेतून या वातानुकूलित शवपेटीचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी सरपंच सविता गाढे, पंडित हरी पाटील, श्याम महाराज, गणेश सुरेश पाटील, राहुल कालू पाटील, मयूर भागवत पाटील तसेच गावातील ज्येष्ठ व तरुण मंडळी उपस्थित होती.वातानुकूलित शवपेटीची ग्रामस्थांना गरज असल्याचे ओळखून कमलबाई पाटील व त्यांच्या परिवाराने राबवलेला हा उपक्रम खरोखरच कौस्तुकास्पद आहे. कारण कोणत्याही प्रसंगात एखाद्याचा मृत्यू झाला आणि त्याचे नातेवाईक येईपर्यंत बराच कालावधी उलटता तर अशावेळी या शवपेटी गरजेची असते. त्यावेळी अनेकांच्या भावनांचा प्रश्न असतो. ही गरज ओळखून हा उपक्रम सुरू केल्याबद्दल पाटील परिवाराचे ग्रामस्थांनी आभार मानले.
रावेर तालुक्यातील उटखेडे येथे शवपेटीचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 3:18 PM
उटखेडा येथील रहिवासी कमलबाई यशवंत पाटील व त्यांच्या पुढाकाराने उटखेडा येथे यशवंत देवचंद पाटील यांच्या स्मरणार्थ वातानुकूलित शवपेटी लोकार्पण सोहळा पार पडला.
ठळक मुद्देकमलबाई पाटील यांचा गावासाठी सामाजिक उपक्रमग्रामस्थांची होणार सोयस्तुत्य उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक