जळगाव,दि.3 - जिल्हा बॅँकेच्या किसान तसेच डेबीट कार्डचे विमोचन सोमवारी दुपारी 2 वाजता माजी मंत्री एकनाथराव खडसे, बॅँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे यांच्या हस्ते झाले. येत्या दोन दिवसात या कार्डचे बॅँकेचे खातेदार व कर्जदार शेतक:याना होईल अशी माहिती यावेळी पत्रकारांना देण्यात आली.
यावेळी बोलताना माजी मंत्री खडसे म्हणाले, बॅँक पूर्वी ड वर्गात होती ती आता अ वर्गात आली आहे. बॅँकेने गेल्या हंगामात 1945 कोटींचे कर्ज वाटप केले आहे. यंदा कर्जमाफी मिळेल या आशेवर असलेल्या शेतक:यांनी कर्जफेड न केल्याने केवळ 25 टक्के म्हणजे जवळपास 500 कोटींची वसुली झाली आहे.
ठेवींमध्ये वाढ
बॅँकेच्या ठेवी पूर्वी 2200 कोटी होत्या. त्यात 800 कोटींची वाढ होऊन आता 3000 कोटींच्या ठेवी झाल्या आहेत. गेल्या वर्षभरात ही वाढ 250 कोटींची आहे. केवळ बॅँकेवर सभासदांचा विश्वास यामुळेच ठेवी वाढल्या आहेत.
बँकेचा एनपीए शून्याकडे
बेलगंगा व सुतगिरणी विक्रीबाबत निर्णयाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यावर अंतिम निर्णय झाल्यावर बॅँकेचा एनपीए शून्यार्पयत येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
किसान कार्ड व डेबीट कार्ड
शेतक:यांना त्यांच्या कर्जाच्या तुलनेत विविध शेतीस आवश्यक वस्तू कॅशलेस पद्धतीने खरेदी करता याव्यात यासाठी किसान क्रेडीट कार्ड तसेच डेबिट कार्ड देण्याचा निर्णय बॅँकेने घेतला. येत्या दोन दिवसात हे कार्ड शेतक:यांर्पयत विविध शाखांच्या माध्यमातून पोहोचेल. यामुळे देशातील कोणत्याही बॅँकेच्या एटीएमवरून जिल्हा बॅँकेच्या डेबिटकार्डवरून रकमा काढणे शक्य होणार आहे.