काळाबाजार : अटकेतील तिघांना कोठडी तर ९ जणांची कारागृहात रवानगी
जळगाव : रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणाचे धागेदोरे शेंदुर्णीपर्यंत पोहोचले असून अभिषेक अग्रवाल या मेडिकल चालकाने हे इंजेक्शन जळगाव शहरात पुरविल्याचे तपासात समोर आलेले आहे. दरम्यान या अग्रवालला पोलिसांनी आरोपी केले असून मात्र फरार झाला आहे.
रेमडेसिविर काळाबाजार प्रकरणात अटकेत असलेला शुभम राजेंद्र शार्दूल (वय २२, रा. झुरखेडा, ता. धरणगाव), मयूर उमेश विसावे (वय २७, श्रद्धा काॅलनी) व आंबेडकर मार्केटमधील नवकार फार्मा या मेडिकलचा मालक अनिल जैन (वय २६) या तिघांना न्यायालयाने बुधवारी पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दुसऱ्या गुन्ह्यातील अटक असलेले शेख समीर सगीर (वय २३, रा.शिवाजी नगर), नवल लालचंद कुंभार (वय २५,रा. खंडेराव नगर), सुनील मधुकर अहिरे (वय ३२, रा. हरिविठ्ठल नगर), झुल्फिकार अली निसार अली सैय्यद (वय २१, रा.धानोरा, ता. चोपडा), मुसेफ शेख कय्युम (वय १९, रा. मास्टर कॉलनी), डॉ. आले मोहम्मद फरीद खान (वय २८, रा.खुबा नगर), हजीम शहा दिलावर शहा (वय २०, सालार नगर) व जुनेद शहा जाकीर शहा (वय २३, रा. सालार नगर) या नऊ जणांची न्यायालयाने कारागृहात रवानगी केली आहे. दरम्यान डॉ. तौफिक शेख हा मुख्य सूत्रधार फरार आहे. दोन्ही गुन्ह्यात प्रत्येकी एक एक आरोपी फरार आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज वाघमारे व उपनिरीक्षक राजेंद्र बोरसे या गुन्ह्यांचा तपास करीत आहेत.