जळगाव : जिल्हाभरात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा कायम असून खासगी रुग्णालयात दाखल रुग्णांच्या नातेवाईकांना आताही या इंजेक्शनसाठी फिरफिर करावी लागत आहे. दुसरीकडे शासकीय यंत्रणेतही या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केवळ काही दिवसांचा साठा शासकीय यंत्रणेत उपलब्ध असल्याची माहिती आहे. दरम्यान, केंद्राने नवीन असले तरी हे इंजेक्शन मिळत नसल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, काही रुग्णालयात माहिती घेतली असता, स्थानिक पातळीवर जो फॉर्म्युला ठरविण्यात आला आहे त्यानुसारच इंजेक्शन विक्री होत असल्याची माहिती मिळाली.
जिल्हाभरात गेल्या महिन्या दीड महिन्यापासून या इंजेक्शनबाबत मोठ्या तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या इंजेक्शनचा सर्रास वापर होत असल्याने ही तुटवड्याची परिस्थिती उद्भवल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यासाठी निकष ठरवून देण्यात आले असून आता या इंजेक्शनच्या वाटपाचे पूर्ण नियोजन शासनाने त्यांच्या हातात घेतले आहे. मध्यंतरी हे इंजेक्शन १२०० रुपयात उपलब्ध करून देण्याचा निर्णय केमिस्ट असोसिएशनने घेतला होता. त्याच्या काही दिवसांनी तुटवडा निर्माण झाला आणि मिळेल त्या किमतीत हे इंजेक्शन घेण्यास रुग्णांचे नातेवाईक तयार झाले.
१ दर प्रशासनानुसारच
आम्हाला इंजेक्शन ज्या किमतीत मिळते त्यावर १२ टक्के जीएसटी आणि १० टक्के मार्जिन या प्रशासकीय आदेशानुसारच आम्ही इंजेक्शन देत आहोत, मात्र ते पुरेसे उपलब्ध होत नसल्याचे एका खासगी रुग्णालयाकडून सांगण्यात आले.
२ आम्हालाच कमी
आमच्याकडे जेवढ्या रुग्णांना इंजेक्शन लागणार त्यापैकी ३० टक्केच इंजेक्शन मिळत आहेत, सध्या तुटवडा खूप आहे त्यामुळे बाहेर देत नाही व किंमतही सांगता येणार नाही, असे एका रुग्णालयाकडून सांगण्यात आले
३ आहे त्या दरातच देतोय
प्रशासनाने जे दर ठरविले आहे त्यानुसारच आम्ही इंजेक्शन देत आहोत, मात्र ते उपलब्ध होत नाहीय, सर्वत्रच त्याचा तुटवडा आहे. असे एका रुग्णालयाकडून सांगण्यात आले.
एकूण रुग्ण -११,१५२८
सध्या उपचार सुरू असलेले रूग्ण -११,१३२
व्हेंटिलेटरवरील रुग्ण -८३२
१०० एमजी इंजेक्शनच्या किमती (नवे दर)
कॅडिला ८९९ रु.
सिल्जिन इंरनॅशनल २४५० रु.
डॉ. रेड्डीज २७०० रु.
सिप्ला ३००० रु.
मायलॅन ३४०० रु.
ज्युिबलंट ३४०० रु.
हेटेरो ३४९० रु.