धुळे : महापालिकेत वादविवादांचे वादळ काही प्रमाणात थंडावले असतानाच आयुक्त डॉ़ नामदेव भोसले यांनी मंगळवारी मुंबईला रवाना होण्यापूर्वी 40 नगरसेवकांना भोगवटा प्रमाणपत्र नसल्याने अनधिकृत बांधकामे 30 दिवसांत काढून घेण्याच्या (52/53)च्या नोटिसा बजावल्या़ त्यामुळे मनपात एकच खळबळ माजली आह़े शहराचे आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या तक्रारीनंतर भोगवटा प्रमाणपत्राचा मुद्दा ऐरणीवर आला़ आ़मदार गोटे यांच्या तक्रारीनुसार, 2013 मध्ये झालेल्या मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना नगरसेवकांनी अर्जात नमूद केलेला पत्ता व निवडणुकीतील शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या राहण्याच्या पत्त्यावरील मिळकतीची बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्र सादर केलेले नाही़ त्यामुळे सर्व नगरसेवकांवर महाराष्ट्र अधिनियम 1949, तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 चे उल्लंघन केल्यामुळे महापालिका अधिनियम 1949 चे कलम 10 च्या पोटकलम 1 (ड) मधील तरतुदीनुसार अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली होती़ त्यानुषंगाने आयुक्त डॉ़ नामदेव भोसले यांनी या तक्रारीची त्वरित दखल घेत सर्व नगरसेवकांना नोटीसवजा पत्र देऊन भोगवटा प्रमाणपत्र व बांधकाम परवानगीबाबत माहिती सादर करून खुलासा करावा, असे स्पष्ट केले होत़े जवळपास 66 नगरसेवकांना त्या वेळी नोटीसवजा पत्र देण्यात आल्याने शिवसेना नगरसेवक नरेंद्र परदेशी यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नगरसेवक एकवटले होते व आयुक्त डॉ़ नामदेव भोसले यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न झाला होता़ मात्र अखेरच्या क्षणी शिवसेनेने माघार घेतल्याने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्या वेळी माघार घेतली होती़ तरीदेखील महासभेत ठराव करून नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यापूर्वी न्यायाधीशांचा सल्ला घेण्यात यावा, असा ठराव करण्यात आला होता़ त्या वेळी मनपात प्रचंड तणाव निर्माण झाला होता़ त्यानंतरही भोगवटा प्रमाणपत्राला दोन वेळा मुदतवाढ देऊन तणाव कायम ठेवण्याचा प्रयत्न झाला होता़ गेल्या तीन महिन्यांपासून भोगवटा प्रमाणपत्राबाबत शांतता प्रस्थापित झालेली असतानाच मंगळवारी आयुक्त डॉ़नामदेव भोसले यांनी ऐन सणासुदीच्या पाश्र्वभूमीवर पुन्हा एकदा 40 नगरसेवकांना नोटिसा काढल्या आहेत़ या नोटिसीत नमूद करण्यात आल्याप्रमाणे नगरसेवकांनी भोगवटा प्रमाणपत्राबाबत सादर केलेला खुलासा समाधानकारक नाही, तसेच नगरसेवकांकडे भोगवटा प्रमाणपत्र नसणे, बांधकाम परवानगी नसणे व मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम नसणे या कारणास्तव नोटिसा बजावण्यात आल्या आहेत़ मंगळवारी दुपारून आयुक्त डॉ़ नामदेव भोसले मुंबईला रवाना झाल़े परंतु रवाना होण्यापूर्वीच त्यांनी सर्व नोटिसांवर स्वाक्ष:या केल्या आहेत़ नोटिसा बजावण्याचे काम सुरू असून आतार्पयत 39 नगरसेवकांना नोटिसा पाठविण्यात आल्याची माहिती नगररचना विभागाने दिली़ एका नगरसेवकाला बुधवारी नोटीस बजावली जाणार आह़े भोगवटा प्रमाणपत्रावरून पुन्हा वादंग होणार हे आता स्पष्ट झाले आह़े
अनधिकृत बांधकामे तत्काळ काढा!
By admin | Published: March 23, 2016 12:21 AM