मुक्ताईनगर : येथील बुऱ्हाणपूर रोडवरील स्मशानभूमीत शहरातील ७० टक्के भागातील नागरिक अंत्यसंस्कार करीत असतात. या स्मशानभूमीचा कायापालट करण्याचे विकासाचं व्हिजन ठेवून या स्मशानभूमीसाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून सुमारे २ कोटी रुपयांचा निधी मंजुरी आणली होता. त्यानुसार १५ जुलै रोजी गुरुवारी स्मशानभूमीच्या नूतनीकरण कामास सुरुवात करण्यात आली आहे.
यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, तहसीलदार श्वेता संचेती, तालुका प्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, शहर प्रमुख गणेश टोंगे, राजेंद्र हिवराळे, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, अल्पसंख्याकचे अफसर खान, नगरसेवक संतोष कोळी, मुकेशचंद्र वानखेडे, संतोष मराठे, गोपाळ सोनवणे, सुभाष टेलर, तुषार बोरसे, उज्ज्वल बोरसे, प्रशांत भोलाणे, प्रशांत पाटील, स्वीय सहायक प्रवीण चौधरी आदींची उपस्थिती होती.
अशी होतील कामे-
नवीन स्मशानभूमीच्या आराखड्यानुसार उत्तर दिशेला अंत्यसंस्कारांचे तीन ओटे व त्याच्यासमोर दक्षिणेकडून स्टेडियम स्वरूपात बसण्यासाठी आसन व्यवस्था असेल. या भागातच शौचालय, बाथरूम व सिक्युरिटी गार्डची राहण्याची व्यवस्था तसेच गोडावून स्वरूपात सरपण ठेवण्याची व्यवस्था असेल. परिसरात आकर्षक पेव्हर ब्लॉक बसविण्यात येऊन आकर्षक झाडांसह सुशोभिकरण येथे करण्यात येणार आहे.
150721\1527-img-20210715-wa0023.jpg~150721\img-20210715-wa0024.jpg
हिंदू स्मशानभूमी चे कामकाजाला सुरुवात करताना भूमिपूजन प्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील तहसीलदार श्वेता संचेती तालुकाप्रमुख छोटू व इतर छायाचित्र विनायक वाडेकर मुक्ताईनगर~स्मशान भूमी