जामनेर : तालुक्यातील शेतक:यांनी बाजार समिती आवारात आणलेल्या तुरीची खरेदी बारदानाअभावी पुन्हा बंद झाली आहे, त्यामुळे उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत.दरम्यान, गेल्या आठवडय़ात शेतकी संघाचे चेअरमन यांनी समितीच्या आवारात तूर भरलेले अनेक ट्रॅक्टर उभे असल्याने त्यांची मोजणी होईर्पयत नव्याने तूर आणू नये, असे आवाहन केले होते. तथापि पुन्हा बारदानांचा प्रश्न उद्भवल्याने ज्यांनी आधीच तूर आणून ठेवली त्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, बारदानासह अन्य समस्यांची सोडवणूक होईर्पयत तूर आणण्यास मनाई करण्यात आली असली तरी गुरुवारी रात्री तुरीच्या तब्बल तीनशे गोण्या काही संचालकांनी आणून टाकल्याचे बोलले जात असून ते गौडबंगाल कायम आहे. नियम पाळण्याचे बंधन जसे शेतक:यांना घालण्यात आले, तोच नियम संचालकांना का नाही? असा सवाल केला जात आहे. वशिलेबाजी करून व केवळ पैसा कमावण्याच्या हेतूने बाजार समितीमध्ये रात्रीतून आणलेली तूर मोजणीसाठी घेऊ नये अशी मागणी शेतक:यांकडून केली जात आहे. एका शेतक:याची जास्तीत जास्त 15 ते 20 क्विंटल तूर मोजली जात असताना एखादा संचालक एवढय़ा मोठय़ा प्रमाणात तूर आणतोच कशी? अशी चर्चा असतानाच आता तर बारदानांअभावी तूर मोजणीत पुन्हा खंड पडला आहे. (वार्ताहर)
बारदानाअभावी पुन्हा तूर खरेदी बंद
By admin | Published: March 28, 2017 12:04 AM