जामनेर: एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सहा महिने ते सहा वर्षे पर्यंतच्या बालकांसह गरोदर व स्ननदा मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात गेल्या महिन्यापासून शासनाने बदल केला आहे. या बदललेल्या आहाराचे वाटप तालुक्यात सुरु करण्यांत आल्याची माहिती या विभागातून मिळाली.पोषण आहारांतर्गत यापूर्वी टीएचआर पाकिटे दिली जात असत. १ मे पासून यात बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार पोषण आहाराचे वितरण करण्यात आले.पर्यायी व्यवस्थेअंतर्गत कच्चे धान्य व किराणा मालाचा पुरवठा केला जाणार आहे. यात चवळी, मसूर डाळ, गहू, मिरची पावडर, हळद पावडर, मीठ,सोयाबीन तेल आदींचा समावेश आहे.प्रति दिन , प्रति लाभार्थी वाटपाचे प्रमाण ठरविण्यात आले असून, ५० दिवस पुरतील इतके आहाराची पाकिटे अंगणवाडीच्या माध्यमातून वितरित केली जात आहे.या पूर्वीच्या पोषण आहार वितरण प्रणाली बाबत लाभार्र्थींच्या तक्रारी होत्या. व त्यात काही ठिकाणी गैर प्रकार झाल्याचा संशय व्यक्त केला गेला होता.टीएचआर पाकिटे प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत न पोहचता ती इतरत्र सापडल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. याची चौकशी मात्र झाली नाही,असे सांगण्यात आले.शासनाच्या निदेर्शानुसार पोषण आहार अंतर्गत टीएचआर पाकीटांएवेजी धान्य व किराणा मालाचा पुरवठा केला जात आहे. अंगणवाडी सेवीका व मदतनीसांचे यासाठी सहकार्य मिळत आहे.बदललेल्या शालेय पोषण आहाराचे वाटप शासन नियमानुसार केले जात आहे.- ईश्वर गोयर, बालविकास प्रकल्प अधिकारी.जामनेर.
बदललेल्या आहाराचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 3:08 PM