जळगाव : रावेर येथील खासगी शासकीय गोदामावर टाकलेल्या छाप्यात केलेल्या कारवाईचा अहवाल पुरवठा विभागाने नाशिक विभागाच्या उपायुक्तांकडे (पुरवठा) पाठविला आहे.अहवालात म्हटले आहे की, रावेर (जि.जळगाव) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील योगेश सोपान पाटील यांच्या मालकीच्या गोदामामध्ये विलास श्रावण चौधरी (रा.रावेर) यांनी सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे वितरीत करावयाचा धान्यसाठा अवैधरित्या काळा बाजारात विकण्याच्या उद्देशाने साठवून ठेवल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी रावेर तहसीलदार देवगुणे व इतर सहकाऱ्यांसोबत खासगी गोदामावर छापे टाकले. त्यात माल जप्त करण्यात आला. विलास चौधरी (रा.रावेर), सुनील बाळकृष्ण नेवे (रा.चंचाळे, ता.यावल) यांच्या विरूध्द जीवनावश्यक वस्तू कायदयान्वये रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे.
रावेर येथील बेकायदेशील धान्य साठ्याचा अहवाल उपायुक्तांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 12:43 PM