ऑनलाईन लोकमत
शेंदुर्णी, ता. जामनेर,दि.5-येथील श्री त्रिविक्रम, कडोजी नामाच्या व संत तुकारामाच्या जयघोषात, टाळ मृदुंगाच्या गजरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी. या वेळी जळगाव, धुळे, औरंगाबाद व बुलडाणा जिल्ह्यातून हजारो भाविकांनी दर्शन घेतले. वर्ष सुखाचे, समृद्धीचे व आरोग्यवर्धक जावे यासाठी ‘पाऊस चांगला पडू दे’ असे साकडे परमेश्वराला घातले.
प्रतिपंढरपूर समजल्या जाणा:या शेंदुर्णी येथे सोमवारी मध्यरात्री महापूजेला जलसंपदामंत्री गिरीश महाजन, नगराध्यक्षा साधना महाजन, डॉ. विकास बोरोले, डॉ. शरयू बोरोले, डॉ.कमलेश मराठे, डॉ.धनश्री मराठे, बबन परदेशी, निर्मला परदेशी, मयुरेश अहिरराव, संगीता अहिरराव, पवन अग्रवाल सप}ीक बसले. मंदिराचे विश्वस्त शिरीष देवकर, भूषण देवकर, महेश देवकर, श्रीराम देवकर यांच्यासह जयवंत पिसे, डॉ.नीलेश राव, विजय पाठक, ज्ञानेश जोशी, सिद्धेश्वर दंडे, चेतन गिरासे, गौरव कुलकर्णी, प्रथमेश गिरासे यांनी पूजा केली.
मंदिराच्या आवारात प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचा:यांनी उपचारार्थ औषधीसह सेवा दिली. विविध सहकारी पतसंस्था, सहकार क्षेत्रातील नेते गण, राजकीय पक्षांतर्फे, मंडळातर्फे मोफत फराळ वाटप, चहा वाटप व पादत्राणे सांभाळणे यासह विविध सेवा ग्रामस्थांनी भाविकांसाठी करून दिल्या. चौकाचौकात भजनी मंडळांनी भजने म्हटली, दिंडय़ांनी वातावरण भक्तिमय झाले. रात्री उशिरार्पयत भाविकांनी दर्शन घेतले. थोडय़ा-थोडय़ा वेळाने पावसाच्या तुरळक सरींनी शेतकरी, भाविक सुखावले.