जळगाव : आगामी काळात होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक होत आहे. त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पंचायत समिती सभापतीपदासाठी ६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आरक्षण सोडत होत आहे.ग्रामविकास व जलसंधारण विभागातर्फे अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यात जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे सभापतीपद १३ मार्च २०१७ पासून पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी सोडत पद्धतीने आरक्षित करण्यात येणार आहे. यासाठी ६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सभा आयोजित केली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्तपं.स. निवडणुकीसाठी जिल्हाधिकाºयांनी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाºयांची नियुक्ती केली आहे. यात चोपडा - रवींद्र भारदे, उपजिल्हाधिकारी धुळे, यावल-मनोज घोडे-पाटील, प्रांताधिकारी, फैजपूर, रावेर- जितेंद्र पाटील, रोहयो उपजिल्हाधिकारी, मुक्ताईनगर- गणेश मिसाळ, प्रांताधिकारी, धुळे, बोदवड- प्रकाश थविल, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, जळगाव, भुसावळ-श्रीकुमार चिंचकर, प्रांताधिकारी, भुसावळ, जळगाव- जलज शर्मा, साहाय्यक जिल्हाधिकारी,जळगाव, धरणगाव- विजयानंद शर्मा, प्रांताधिकारी, धरणगाव, अमळनेर-संजय गायकवाड, प्रांताधिकारी, अमळनेर, पारोळा- राजेंद्र कचरे, प्रांताधिकारी, पारोळा, एरंडोल- विक्रम बांदल, प्रांताधिकारी, एरंडोल, जामनेर- अभिजित भांडे, उपजिल्हा धिकारी , जळगाव, पाचोरा-मनिषा खत्री-शर्मा, साहाय्यक जिल्हाधिकारी, पाचोरा, भडगाव-रमेश मिसाळ, मुख्याधिकारी म्हाडा, नाशिक, चाळीसगाव- शरद पवार, प्रांताधिकारी, चाळीसगाव यांची नियुक्ती केली आहे.
सभापतीपदासाठी ६ रोजी आरक्षण सोडत
By admin | Published: January 04, 2017 12:46 AM