जळगाव : घरासमोर फटाके फोडणाऱ्यांना हटकल्याने त्याचा राग येवून चार ते पाच तरुणांनी कमलबाई दिलीप पाटील (४५) व विजय दिलीप पाटील (२५ रा.कुसुंबा) या मायलेकास बेदम मारहाण झाली, त्यानंतर पोलिसांच्या मेमोवरुन जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या या मायलेकांचा पाठलाग करुन तेथेही या टोळक्याने मारहाण केली तर राहूल रामचंद्र बºहाटे याने विजयवर चॉपरचा हल्ला केला. गुरुवारी सायंकाळी घडलेल्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ धाव घेतल्याने मोठी घटना टळली.कुसुंबा येथे गुरुवारी सायंकाळी ४ वाजता काही तरुणांनी कमलबाई यांच्या घरासमोर फटाके फोडण्यास सुरुवात केली. कमलबाई यांनी संबंधित तरुणांना हटकले, असता त्याचे वाईट वाटल्याने तरुणांनी कमलबाई यांना छाती, पोटात लाथा बुक्कयांनी बेदम मारहाण केली. आईला सोडविण्यास आलेला विजय यालाही तरुणांनी मारहाण केली. आईसह लेकाला बेदम मारहाण करुन सर्व पसार झाले. मारहाणीनंतर कमलबाई यांनी मुलगा विजयसह तक्रारीसाठी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. याठिकाणी पोलिसांनी दोघांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल होण्यास सांगितले. यानंतर दोघे जिल्हा रुग्णालयात आले. मारहाण करणारे तरुण त्याचा पाठलाग करत होते, जिल्हा रुग्णालयात प्रवेश करताच १० ते १५ जणांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळच दोघांना अडवून पुन्हा बेदम मारहाण केली. याठिकाणी एकाने विजयच्या डाव्या हातावर चॉपर मारला. यावेळी सुरक्षारक्षकांसह इतर नागरिकांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला, संशयित पसार झाले.अज्ञात व्यक्तीच्या कॉलवरुन सहायक अधीक्षक दाखलनागरिकांना तक्रारीसाठी पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी आपला मोबाईल क्रमांक उपलब्ध करुन दिला आहे. त्यानुसार जिल्हा रुग्णालयातील घटनेबाबतही त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन घटनेची माहिती दिली असता ते अवघ्या काही मिनिटातच दाखल झाले. यानंतर काही वेळाने जिल्हापेठ पोलीस निरीक्षक अकबर पटेल तसेच गुन्हे शोध विभागाच्या कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.जिल्हापेठच्या कर्मचाऱ्यांनी जखमी विजय व त्याची आई कमलाबाई यांचा जबाब घेतला, तसेच प्रत्यक्षदर्शी सुरक्षा रक्षकांकडून माहिती जाणून घेतली. या घटनेने जिल्हा रुग्णालयात एकच खळबळ उडाली होती.संशयितापैकी एकाचा कंपनीत दारुचा अड्डाजखमी विजय पाटील हा एमआयडीसीतील चटई कंपनीत कामाला आहे. मारहाण करणाºयांपैकी एकाचे नाव राहूल बºहाटे असून त्याचा एमआयडीसीतील बंद कंपनीत दारुचा अड्डा असल्याचे विजय याने सांगितले.
फटाके फोडण्यास विरोध; मायलेकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 1:13 PM