पारोळा, जि.जळगाव : तालुक्यातील सर्वच धरणे कोरडीठाक झालेली आहेत. एकमेव बोरी धरणावरून दिवसातून १३ गावांना १२ टँकरने २६ फेऱ्यांद्वारे एक लाख ८० हजार लीटर पाण्याचा उपसा होत आहे. यामुळे बोरी धरणावरून शहराला होणार पाणीपुरवठा हादेखील एप्रिल-मे महिन्यात अडचणीचा ठरणार आहे. पाण्याचा उपसा असाच सुरू राहिला शहरात पाण्याअभावी महिन्यातून दोन वेळा पाणीपुरवठा केला जाईल, अशी स्थिती निर्माण होईल, असे आज तरी दिसत आहे.१५ मार्चपर्यंत बोरी धरणाची पाणी पातळी २६०.९८ मीटर व साठा ८.१० दश लक्ष घन मीटर एवढा आहे. तामसवाडी, देवगाव, मुंदाणे, आडगाव, गडगाव, बोळे, टोळी, पिंप्री, करंजी, मुंदाणे, हिवरखेडे, ढोली, करमाड खुर्द, करमाड बुद्रुक, वेल्हाणे आदी गावांची पाणीपुरवठा योजना ही बोरी धरणावर अवलंबून आहे. तालुक्यात एकूण ३८ गावांना तीव्र पाणी समस्या निर्माण झाली आहे.टँकरने पाणी पुरवठा होत असलेली गावेवडगाव प्र.अ, मंगरुळ, पोपटनगर, खोलसर, भोंडनदीगर, धाबे वडगाव, चहुत्रे, सांगवी, मेहू, टेहू, जोगलखेडे, हनुमंतखेडे, मोहाडी.टँकरसाठी प्रस्ताव मंजुरीसाठीची गावे -कन्हेरे, खेडीढोकटँकर मागणी असलेली गावे -देवगाव, तरवाडे, लोणीसीम, लोणी खुर्द, लोणी बुद्रूक, रत्नापिंप्री, भोलाणे, वसंतनगर, हिवरखेडे बुद्रूक, कंकराज, जिराळी.विहीर अधिग्रहित केलेली गावे-आंबापिंप्री, भिलाली, महालपूर, जिराळी, शेवगे बुद्रूक, शेळावे खुर्द, दगडी सबगव्हाण, चिखलोड, नेरपाट, हिरापूर, नगाव, धाबे आदी गावांचा समावेश आहे.तालुक्यात असलेली धरणे व त्यांची स्थितीधरणाचे नाव एकूण उपयुक्त मृतसाठा साठा साठा१. बोरी ४०.३१ २५.१५ १५.१६द.ल.घ.मी. द.ल.घ.मी द.ल.घ.मी.२. म्हसवे ०.२०७ ०.२०७ --द.ल.घ.मी. द.ल.घ.मी द.ल.घ.मी.३. पिंपळकोठा ०.३६२ ०.०४४ --द.ल.घ.मी. द.ल.घ.मी द.ल.घ.मी.४. इंदासी - निरंक (शून्य साठा)५. भोकरबारी - निरंक (शून्य साठा)६. खोलसर - निरंक (शून्य साठा)७. कंकराज - निरंक (शून्य साठा)८. शिरसमणी- निरंक (शून्य साठा )९)सावरखेडे - निरंक (शून्य साठा)अशी प्रमुख आणि लघु धरणांची स्थिती आहे .