महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस(इंटक) संघटनेचा विभागीय मेळावा रविवारी सकाळी इंटकचे प्रदेश अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांच्या उपस्थितीत धनाजी नाना चौधरी महाविद्यालयाच्या प्रांगणात झाला. या मेळाव्याला प्रदेश सचिव मुकेश तिगोटे, अमरावती विभागाचे सचिव राजेंद्र घुगे, विकास तिवारी,राज्य खजिनदार विजय गायकवाड, श्रीधर चौधरी, अविनाश भालेराव,विजय वाणी यांच्यासह इंटक संघटनेचे विभागीय कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, खजिनदार दिनेश महाशब्दे, मनोहर मिस्तरी, रवींद्र पाटील, यांच्यासह नाशिक, धुळे, नंदुरबार, बुलढाणा व जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जयप्रकाश छाजेड यांनी महामंडळाला राज्य शासनात विलिनीकरणासह केंद्र सरकारने केलेल्या कायद्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावरही चर्चा झाली. संघटनेचा वार्षिक हिशोब, निधी याबाबतही चर्चा माहिती देण्यात आली. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन छाजेड यांनी मेळाव्यात दिले. मेळावा यशस्वीतेसाठी प्रताप चव्हाण , संजय तायडे, कैलास पाटील, मयूर बडगुजर, विलास वराडे यांनी परिश्रम घेतले.
इन्फो :
इंटकच्या कार्यालयाचे उद्घाटन :
जळगावातील इंटकच्या पदाधिकाऱ्यांसाठी रविवारी जिल्हा काँग्रेस भवनाच्या इमारतीत जिल्हा इंटक कार्यालयाचे इंटकचे प्रदेश अध्यक्ष जयप्रकाश छाजेड व जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. संदीप पाटील यांनी कार्यालयासाठी जागा उपलब्ध करुन दिली असल्याचे इंटकतर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
मयत मनोज चौधरीच्या कुटुंबाचे सांत्वन :
इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड व सरचिटणीस मुकेश तिगोटे हे मुंबईहून सकाळी जळगावला आल्यानंतर मयत मनोज चौधरीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांना शासनाकडून नियमानुसार सर्व प्रकारची मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी विभागीय अध्यक्ष भगतसिंग पाटील, विभागीय सचिव नरेंद्रसिंह राजपूत, प्रसिद्धीप्रमुख संदीप सूर्यवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.