जळगाव : कोरोनो विषाणूच्या प्रादुभार्वामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा व शैक्षणिक विषयक मार्गदर्शन व शंकांचे निरसन करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात स्थापन करण्यात आलेल्या विद्यार्थी शंका निरसन कक्षात गेल्या बारा दिवसात ६९२ विद्यार्थ्यांच्या शंकाचे समाधान करण्यात आले आहे.उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी गठीत केलेल्या राज्यस्तरीय समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार कोव्हिड-१९ च्या प्रादुभार्वामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा व शैक्षणिक हितासाठी मार्गदर्शन मिळावे यासाठी विद्यापीठांमध्ये विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष व हेल्पलाईन सुरू करावी असे नमूद करण्यात आले आहे.त्या अनुषंगाने कुलगुरू प्रा पी.पी.पाटील यांच्या आदेशानुसार ११ मे पासून हा कक्ष स्थापन केला. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा.ए.बी.चौधरी हे कक्षाचे समन्वयक म्हणून काम पहात आहेत.गेल्या बारा दिवसांत दुरध्वनी द्वारे ४९८ व मेलद्वारे १९४ विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या अनुषंगाने प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नाचे समिती सदस्यांनी निरसन केले. या कक्षात सदस्य म्हणून प्रा.समीर नारखेडे,प्रा.किशोर पवार, प्रा.अजय पाटील, प्रा.नवीन दंदी प्रा.उज्ज्वल पाटील हे काम पहात आहेत.