जळगाव - स्वामी विवेकानंदांनी केलेल्या आवाहनानुसार युवकांनी आत्मविकासाबरोबरच समाजाच्या विकासाचा संकल्प करावा असे आवाहन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. दिलीप रामू पाटील यांनी केले. विद्यापीठाच्या स्वामी विवेकानंद अध्ययन व संशोधन केंद्र व आशा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात "युगनायक स्वामी विवेकानंद" या विषयावर ते बोलत होते.
याप्रसंगी या संस्थांनी आयोजित केलेल्या विवेक स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला. केंद्राचे संचालक प्रा. डॉ. मनिष जोशी, आशा फाउंडेशनचे कार्यकारी संचालक गिरीश कुळकर्णी उपस्थित होते.
प्रा. डॉ. मनिष जोशी यांनी प्रास्ताविक केले. व्यवस्थापिका सुजाता बोरकर यांनी आभार तर गिरीश कुळकर्णी यांनी सूत्र संचालन केले.
विवेक स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे
(प्रथम, द्वितीय, तृतीय अनुक्रमे)
चित्रकला स्पर्धा - शालेय गट - निकिता पाटील ( विद्या इंग्लिश स्कूल), सानिका पाटील ( लुंकड कन्याशाळा), रेहान तडवी ( बालनिकेतन विद्यालय), महाविद्यालय गट - सुदेश ठोके (गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन हर्सूल, जि. औरंगाबाद ), प्रिया कासार ( मु. जे. महाविद्यालय ), हर्षदा पाटील ( चित्रकला महाविद्यालय, मुक्ताईनगर), खुला गट - प्रथम - चंद्रकांत कोळी ( जामनेर), द्वितीय - आसावरी जोशी (जळगाव)
निबंध स्पर्धा - शालेय गट - अनुष्का पाटील ( विद्या इंग्लिश स्कूल), नीरज पर्वते ( जय दुर्गा माध्यमिक विद्यालय ), हर्षदा वंजारी (या. दे. पाटील विद्यालय),
महाविद्यालय गट - माधुरी पाटील (एस.एस.व्हि.पी.एस. कॉलेज, धुळे), पल्लवी पांगारे (जी. टी. पाटील कॉलेज, नंदुरबार), प्रतीक बिरपन ( सरदार जी. जी. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज , रावेर)
खुला गट - अशोक पारधे (जळगाव), वर्षा अहिरराव (उपशिक्षिका या. दे. पाटील विद्यालय), तृतीय (विभागून) - रुपाली पाटील ( मलकापूर ) , डॉ. रुपेश मोरे (गणित विभागप्रमुख , कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बोदवड , जि. जळगाव )
वक्तृत्व स्पर्धा - शालेय गट - कुशलकुमार माळी (सोढा हायस्कूल, नवापूर, जि. नंदुरबार), सृष्टी कुलकर्णी ( झांबरे हायस्कूल), मयुरी भोकरे (पाटील विद्यालय), महाविद्यालय गट - प्रथम - विजया काळे (अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय चिखली , जि. बुलढाणा), भाविका बिरपन ( सरदार जी. जी. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज , रावेर), गायत्री सोनार (व्ही. एस. नाईक कॉलेज, रावेर)