शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

निवडणुकीच्या तोंडावर प्रवाशांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 6:22 PM

राजधानी एक्सप्रेसचीदेखील मागणी पूर्ण

सचिन देवजळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून सचखंड एक्सप्रेस, महानगरी एक्सप्रेस या गाड्यांना पाचोरा, चाळीसगाव या ठिकाणी थांबा मिळण्याची प्रवाशी संघटनांकडून मागणी सुरु होती. भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर साडेचार वर्षांत या पैकी कुठलीही मागणी मान्य होत नसल्यामुळे प्रवाशी संघटनांकडून खासदारांकडे पाठपुरावा सुरु होता आणि पुढील आठवड्यात या दोन्ही गाड्यांना पाचोरा व चाळीसगाव या टिकाणी थांबा मिळणार असल्याने प्रवाशाांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, साडेचार वर्षांपासून सुरु असलेल्या पाठपुराव्याला आत्ताच फळ मिळाल्यामुळे, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रवाशांना खूष करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा सध्या गुलाबी थंडीत जोरदार सुरु आहे.भाजपा सरकार सत्तेत येण्यापूर्वी पासून अनेक लांब पल्ल्याच्या सुपरफास्ट गाड्यांना जळगाव व भुसावळ व्यक्तीरिक्त कुठल्याही स्थानकावर थांबा नव्हता. या मुळे प्रवाशांना जळगाव किंवा भुसावळला जाऊन ही गाडी पकडावी लागायची. चाळीसगाव ते भुसावळ दरम्यान दररोज दोन हजार चाकरमानी अफडाऊन करत असतात. सकाळ व सायंकाळ धावणारी पँसेजर व इतर ठराविक गाड्यानांच थांबा असल्यामुळे प्रवाशांची अफडाऊनसाठी तारेवरची कसरत व्हायची. जर यदा कदाचीत गाडी सुटली तर तिप्पट भाडे खर्च करुन, चाळीसगावहून जळगावला यावे लागायचे व यामुळे मनस्तापदेखील व्हायचा.शेवटी प्रवाशांच्या पाठपुराव्याला निवडणुकीच्या तोंडावर का असेना, यश मिळाल्यामुळे प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर त्रास वाचणार आहे. तसेच अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या राजधानी एक्सप्रेसचीदेखील मागणी पूर्ण झाल्यामुळे, प्रवाशांच्या आनंदाला पारा उरलेला नाही. सोशल मीडियावर प्रवाशी संघटनांकडून तर खासदार ए. टी. पाटील व खासदर रक्षा खडसे यांच्या आभाराचे दर सेंकदाला बँनर झळकत आहेत. दुसरीकडे प्रवासी संघटनांमध्येदेखील ‘श्रेय’ लाटण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर जोरदार जाहिरात बाजी सुरु आहे.जाता जाता -गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी गेल्या महिनाभरात झटापट पूर्ण झाल्यामुळे, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, प्रवाशी मित्रांनी यावर समाधानी न होता, प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन, मुंबई-भुसावळ पँसेजर, नाशिक -भुसावळ पँसेजर या गाड्यांना जादा डबे जोडण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच हुतात्माची पुण्याला जाण्यासाठी रात्रीची १२ ची वेळ असल्यामुळे, अनेक प्रवाशांना त्रास होत असून,या गाडीची वेळ बदलणे गरजेचे आहे. तसेच चाकरमान्यासांठीदेखील मनमाड ते भुसावळ दरम्यान स्वतंत्र गाडी सुरु करणे गरजेचे आहे.