जळगाव - मायबोली मराठी भाषेचा आदर करा, असे प्रतिपादन साहित्यिक प्रा. डॉ. किसन पाटील यांनी केले.केसीई सोसायटी संचलित ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्ताने विविध स्पर्धांच्या बक्षिस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शालेय समन्वयक चंद्रकांत भंडारी, मुख्याध्यापक डी.व्ही.चौधरी, पर्यवेक्षिका प्रणिता झांबरे, ए.एन.पाटील, वर्षा राणे, डी.ए.पाटील, सतिश भोळे, आर.एन.तडवी, उपस्थित होते.पुस्तक देवून गौरवविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्ताने इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तक अभिवाचन स्पर्धा, मराठी व्याकरण स्पर्धा, वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना पुस्तक स्वरूपात बक्षीस देवून गौरविण्यात आले. आभार प्रदर्शन प्रतिभा लोहार यांनी केले. तर सूत्रसंचालन सी.बी.कोळी यांनी केले.