पारोळा : येथील सेवाभावी जैन युवक मंडळ व श्री जी ग्रुप यांनी पूरग्रस्त कोकणातील महाडमध्ये सलग सहा दिवस २० ते २२ हजार पूरग्रस्त नागरिकांना चहा, नाश्ता व जेवण अशी सेवा दिली होती. मदतीसाठी सरसावलेल्या हातांची या सामाजिक कार्याची दखल पारोळा सराफ असोसिएशने घेतली. ५ रोजी सदर मंडळ व ग्रुपच्या सदस्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.उद्योजक उमेश चोरडिया यांच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष केशव क्षत्रिय, सराफ असो. अध्यक्ष योगेश सोनार, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब भोसले, मेडिकल असो.चे एसी सदस्य अभय पाटील, सराफ असो. कोषाध्यक्ष अनिल टोळकर आदी उपस्थित होते.याप्रसंगी जैन नव युवक मंडळाचे प्रमुख उमेश जैन यांच्यासह सदस्यांचा सन्मान चिन्ह, गौरवपत्र, शाल, श्रीफळ देऊन करण्यात आला.यावेळी सुनील भालेराव यांनी प्रस्तावनेत जैन युवक मंडळाच्या कार्याची माहिती देताना त्यांनी या पूर्वीही कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेतही मोठ्या प्रमाणावर अन्नदान केल्याचे सांगून प्रशासनास ड्युरा सिलिंडरसाठी मदत दिली.यावेळी रावसाहेब भोसले यांनी जैन युवक मंडळाने महाडच्या पूरग्रस्तांची मदत करीत त्यांचे अश्रू पुसण्याचे काम करीत त्यांच्या हृदयात पारोळा शहराचे नाव कोरले. त्यांनी कठीण परिस्थितीत मदत कार्य करून शहराला सेवेचा एक आदर्श निर्माण करून दिला, असे सांगितले.अभय पाटील, केशव क्षत्रिय यांनी जैन मंडळाच्या कार्याचा समाजाने आदर्श घेण्याचे आवाहन केले.यावेळीं सराफ असो.कडून महाड येथे सेवा देणाऱ्या जैन मंडळाचे उमेश चोरडिया, कमलेश लुनावत, दिनेश खिवसरा, दीपक भंडारी, भरत चोरडिया, हरीश बोहरा, धीरज भंडारी, मयूर छाजेड तर श्रीजी ग्रुपचे स्वप्नील पाटील, समाधान पाटील, आप्पा पाटील, हर्षल व दरबार पाटील, भय्या पाटील, विजय व रुपेश जाधव, वसीम बागवान व निखिल चौधरी यांचा गौरव केला.यावेळी सराफ असो.चे योगेश सोनार, अनिल टोळकर, सुनील भालेराव, अमोल दानेज, आकाश महाजन, रोशन शहा, किशोर वाणी, आशिष वाणी, महावीर जैन, विजय सराफ, अशोक पवार, दीपक अहिरराव, किरण बाविस्कर, शेखर जडे, गिरीश टोळकर, मिलिंद विसपुते, गणेश थोरात, दिनेश अहिरराव, अमोल जगताप उपस्थित होते.
महाड येथे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावलेल्या हातांचा पारोळावासीयांकडून सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2021 9:55 AM