जळगाव : येथील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय, जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाकाळात निरोगी शरीर व मनासाठी योगसाधना या विषयावर ऑनलाइन राज्यस्तरीय वेबिनार नुकतेच पार पडले. यात योगतज्ज्ञ डॉ. संजय खळतकर यांनी मार्गदर्शन केले.
खळतकर यांनी अष्टांग योगमधील यम, नियम, आसान, प्राणायाम, प्रत्याहार धारणा, ज्ञान आणि समाधी यांची सविस्तर माहिती दिली. यावेळी विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, मनपाचे क्रीडा अधिकारी चंद्रकांत वांद्रे, जिल्हा ॲथलेटिक्स असो.चे चेअरमन एम.वाय. चव्हाण उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर.बी. वाघुळदे होते. वेबिनार यशस्वीतेसाठी आमदार प्रा. शिरीष चौधरी यांच्या सहकार्य मिळाले तर राजेश जाधव यांनी सूत्रसंचालन केले. आभार डॉ.पी.आर. चौधरी यांनी मानले.
डॉ. राजकुमार लोखंडे, डॉ. रवींद्र लढे, प्रा.सुनील पाटील, सुशील झांबरे यांचे तांत्रिक सहकार्य लाभले.