जळगाव : हल्दी ज्वेलर्स यांचा मंगळसूत्र व नेकलेस महोत्सवाची श्री कच्ची ओस्वाल भवन जळगाव व हॉटेल मान रेसिडेन्सी भुसावळ येथे १३ जानेवारी रोजी सुरुवात झाली आहे. महोत्सव १८ जानेवारीपर्यंत सुरू आहे. सकाळी १० ते रात्री १० या वेळेत सुरू असलेल्या या महोत्सवाला दोन्ही शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवात एक ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांच्या विविध शृंखलेत राणीहार, मंगळसूत्र, मोनी बँगल्स, टाॅप्स, मोतीहार आणि इतर दागिने उपलब्ध आहे. ग्राहकांनी खरेदी करताना ‘लोकमत’मध्ये १५ जानेवारी रोजी प्रकाशित झालेली जाहिरात सोबत आणल्यास खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एक ग्रॅम सोन्याचे गोफ मोफत मिळणार आहे. ग्राहकांनी अवश्य भेट द्यावी, असे आवाहन केले आहे.
‘द मॅग्नेट फॅशन ॲण्ड लाइफस्टाईल एक्झिबिशन’ला आज सुरुवात
जळगाव :‘द मॅग्नेट फॅशन ॲण्ड लाइफस्टाईल एक्झिबिशन’चे १६ आणि १७ जानेवारी रोजी हॉटेल क्रेझी होम येथे सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत आयोजन केले आहे. ५०पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल येथे असतील. साड्या, डिझायनर कुर्ती, वेस्टर्न, जीन्स, टॉप बग्स, पर्सेस, ज्वेलरी, फूट वेअर, सौंदर्य प्रसाधने, गिफ्ट आयटम, होम डेकोर आणि सोबतच मेन्स वेअरसह बरेच काही एकाच ठिकाणी आणि तेही रास्त भावात मिळणार असल्याने हे एक्झिबिशन एक पर्वणीच ठरणार आहे. या एक्झिबिशनमध्ये मुंबई, पुणे, अहमदाबाद, सुरत, बडोदा, इंदूर, जयपूर, बनारस, औरंगाबाद यासोबतच जळगावमधील दर्जेदार उत्पादनाचे स्टॉल आहेत. अधिक माहितीसाठी मुनिरा तरवारी अथवा रितू अग्रवाल यांच्याशी संपर्क साधावा.
कीर्तना मोटर्सतर्फे ‘जावा‘च्या शोरूमचा शुभारंभ
फोटो आहे ...
जळगाव : अजिंठा चौफुलीजवळ जागतिक दर्जाच्या ‘जावा’ या दुचाकी वाहन विक्रीच्या कीर्तना मोटर्सचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, विनय पारख, उमाकांत चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटनप्रसंगी २१ गाड्यांचे बुकिंग व त्यांचे वितरण केले. ‘जावा’ हा जागतिक दर्जाचा ब्रॅँड असून, आकर्षक रंग, स्टायलिश, मजबूत असल्यामुळे जिल्ह्यातील तरुणाई व वृद्ध यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे, शिवाय कीर्तना मोटर्सतर्फे कर्ज सुविधा व एक्स्चेंज ऑफरही दिली जात आहे. जळगावातील नामांकित मेजर नाना वाणी यांनीही ‘जावा’ची सफर करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. ‘जावा’ या अत्याधुनिक जागतिक बॅँडच्या गाडीची खरेदी करावी, असे आवाहन संचालक उमाकांत चौधरी, गिरीश चौधरी यांनी केले आहे. सूत्रसंचालन रामचंद्र पाटील यांनी केले.
‘मल्हार’`तर्फे ‘हॉबी डुबी डू गाइड’ डिरेक्टरीचे प्रकाशन
जळगाव : मल्हार कम्युनिकेशनतर्फे हॉबी डुबी डू गाइड या डिरेक्टरीचे प्रकाशन करण्यात येणार आहे, तसेच या डिटेक्टरीचे व ऑनलाइन पोर्टलचे लवकरच प्रकाशन होणार आहे. यावेळी चंद्रशेखर नेवे, हर्षल पाटील, सुदिप्ता सरकार, अनुषा महाजन, निरंजन शेलार व तन्वी मल्हारा, तनय मल्हारा व मल्हार कम्युनिकेशन्सचे आनंद मल्हारा उपस्थित होते. या डिरेक्टरीमध्ये विविध कला शिकविणाऱ्या सर्व मास्टर्स, कोचेस व संबंधित संस्थांची माहिती असणार आहे, तसेच विविध दुर्मीळ वस्तूंच्या संग्रहाची माहिती, स्टार परफॉर्मिंग कलावंताची माहिती, परिसरातील नवे पर्यटन आदी माहिती असणार आहे.