शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

‘रणरागिनीं’च्या हाती बसेस दुरुस्तीची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2020 12:22 PM

पुरुष कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने करतात अवघड काम

सचिन देवजळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून पुरुष कर्मचाऱ्यांकडे असलेली एस. टी. बसेसच्या दुरुस्ती जबाबदारी,आता महिला कर्मचाºयांकडेदेखील आली आहे. अवजड अशा बसेसची स्वत : संपुर्ण दुरुस्ती करुन, या महिला लालपरीला रस्त्यावर उतरण्यासाठी सज्ज आहेत. काम करतांना त्यांची चिकाटी, हिंमत आणि उत्साह सर्वांना प्रेरणा देत आहे.एकेकाळी सर्वच क्षेत्रात असलेली पुरुषांची मक्तेदारी २१ व्या शतकातील सावित्रीच्या लेकींनी मोडून काढली आहे. प्रत्येक आव्हानात्मक क्षेत्रात महिलांनी प्रवेश केल्यानंतर, एस. टी. महामंडळ हे क्षेत्रदेखील मागे राहिलेली नाही. विशेष म्हणजे अत्यंत अवघड व जबाबदारीचे काम असलेल्या जळगाव आगाराच्या यांत्रिक कार्यशाळेतील बसेसची दुरुस्ती पुरुषांप्रमाणे महिलांच्या हाती आली आहे. लालपरीच्या दुरुस्तीचे कुठलेही काम असो किंवा रस्त्यावर बंद पडलेली बस पुन्हा दुरुस्ती करायचे काम असो, हे सर्व आव्हानात्मक काम या ‘रणरागिनी ’लिलाया पार पाडत आहेत.आव्हानात्मक कामाचा वेगळाच आनंदकार्यशाळेत सहायक मेकॅनिकलची मनिषा बडगुजर, सिमा पाटील, कविता बारी यांच्याकडे जबाबदारी असून, पुष्पा अहिरे व वंदना बिºहाडे यांच्याकडे इलेक्ट्रीशियनची जबाबदारी आहे. इयत्ता १० वी नंतर आयटीआय करुन या महिला २०१३ पासून झालेल्या भरती प्रक्रियेच्या माध्यमातुन आगारात भरती झाल्या आहेत. कार्यशाळेत या महिलांना पुरुष कर्मचाºयांप्रमाणे इंजिनची दुरुस्ती व इतर तांत्रिक काम करावे लागते. अनेकवेळा बस दुरुस्त करतांना, या महिलांची कसोटीच असते. बसेस दुरुस्तीवेळी वेगवेगळ््या ‘स्पेअर पार्ट’ची दुरुस्ती करतांना हे काम खुप अवघड वाटते. मात्र, पुरुषांच्या बरोबरीने हे आव्हानात्मक काम करतांना, आपल्याला काम केल्याचा एक वेगळाच आनंद मिळत असल्याचे मत महिलांनी व्यक्त केले.पहाटे चारपासून सुरु होते दिनचर्यानोकरीसोबतच कुटुंबाचीदेखील जबाबदारी असल्याने, या रणरागिणींंची दिवसाची सुरुवात पहाटे चारपासूनचं होते. सकाळी साडेसातला कामावर हजर व्हायचे असल्याने, स्वयंपाक, धुणी-भांडी, मुलांच्या शाळेच्या तयारी, सासू-सासºयाची सेवा, पतीचा डबा व त्यानंतर स्वत:ची तयारी करण्यासाठी पहाटे चारलाच उठावे लागत असल्याचे या महिलांनी सांगितले. वर्षांतील दसरा असो किंवा दिवाळी बहुतांश सण -उत्सव हे कामावरचं जात असतात, असे त्या सांगतात.दसरा, दिवाळीसारखा आनंदआम्हाला हे काम खरोखरच आव्हानात्मक वाटते. आजपर्यंत हे काम म्हणजे पुरुषांची मक्तेदारी होती अन् आता या कामात आम्हीही पुढे आहोत, हे आम्ही सिध्द केले आहे. या कामाच्या आनंदातून आम्हाला दररोज दसरा आणि दिवाळीसारखा आनंद मिळत आहे. आम्ही सर्व महिला एकत्रितपणे काम करत असल्याने ‘एन्जॉय’ करतच आमचे काम चालते. पहिले हे काम करताना थोडा त्रास जाणवला, पण आता हे काम अंगवळणी पडल्याचे या महिलांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव