जळगाव : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या मंगळवारी जाहीर झालेल्या निकालात यंदादेखील मुलांंच्या तुुलनेत मुुलींनी बाजी मारली. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर ९३.६० व रावेर तालुक्यातील उच्च माध्यमिक विद्यालयांचा ९३.३६ टक्के निकाल लागला.इयत्ता १२ वीच्या परीक्षेसाठी जळगाव जिल्ह्यातील ४८ हजार ६९० विद्यार्थी बसलेले होते. त्यातील नियमित विद्यार्थी ४८ हजार ६१८ विद्यार्थ्यांचा समावेश होता. यापैकी २४ हजार १७४ विद्यार्थी तर १७ हजार ९३४ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी ही ८४.२० टक्के तर विद्यार्थीनींच्या निकालाची टक्केवारी ही ९०.०८ टक्के इतकी आहे.अमळनेर व रावेर तालुक्याचा सर्वाधिक निकालबारावीच्या निकालात अमळनेर तालुक्याचा ९३.६० तर रावेर तालुक्याचा ९३.३६ टक्के निकाल लागला. त्या खालोखाल भडगाव ९२.२७, यावल ९१.४३, धरणगाव तालुक्याचा निकाल ९०.७५ टक्के निकाल लागला आहे.रावेर, धरणगाव, अमळनेर, भडगाव तालुक्यात मुलींचे वर्चस्वरावेर, धरणगाव, अमळनेर, भडगाव तालुक्यातील निकालावर मुलींचे वर्चस्व राहिले.या तालुक्यात मुलींचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. जळगाव शहरात देखील मुलींच्या निकालाची टक्केवारी ८६.९० इतकी राहिली. सर्वच तालुक्यांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण जास्त आहे.उत्तीर्ण विद्यार्थीतालुका विद्यार्थी विद्यार्थीनीअमळनेर 2163 1348भुसावळ 2031 1662बोदवड 241 322भडगाव 1454 934चाळीसगाव 1719 1312चोपडा 1977 1405धरणगाव 1046 603एरंडोल 652 531जळगाव 826 404जामनेर 1290 1287मुक्ताईनगर 679 664पारोळा 1481 896पाचोरा 1507 1223रावेर 1831 1318यावल 2026 1292जळगाव शहर 3251 2754एकुण 24174 17934
बारावी परीक्षेचा निकाल :यंदाही मुलींनी मारली निकालात बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 10:31 PM