आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.५ - अरबी समुद्राच्या किनाºयावर आलेल्या ‘ओखी’ वादळाचा परिणाम जळगाव जिल्ह्यातील वातावरणात देखील पहायला मिळत आहे. मंगळवारी शहरात वादळामुळे दिवसभर ढगाळ वातावरण पहायला मिळाले. तसेच किमान तापमानात २ अंशाची घट होवून जळगावचा पारा १५ अंशावर होता. तसेच दिवसभर १८ ते २० किमी वेगाने थंड वारे सुरु असल्याने वातावरणात गारवा जाणवला. दरम्यान, बुधवारी देखील वादळाचा परिणाम जाणवणार असून, जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
भारताच्या पश्चिम किनाºयालगतच्या लक्षव्दिप बेटापासून सुरु झालेल्या ‘ओखी’ वादळाचा प्रवास महाराष्टÑाच्या कोकण व मुंबई किनारपट्टीपर्यंत आला आहे. या वादळामूळे कोकणासह उत्तर महाराष्टÑातील धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील वातावरणात देखील झाला आहे. भारतीय हवामान खात्याकडून ३ ते ६ डिसेंबर दरम्यान खान्देशात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, मंगळवारी जळगाव जिल्ह्यातील काही भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. दोन दिवसात ओखी वादळाचा परिणाम कमी होणार असला तरी जिल्ह्यात अजुन तीन ते चार दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
दिवसर सुरु होते थंड वारेजसजसे वादळ उत्तर महाराष्टÑाच्या दिशेने येईल, त्याचप्रमाणे वाºयांचा वेगात देखील वाढ होणार आहे. मंगळवारी शहरात दिवसभर १८ ते २० किमी प्रतीतास वेगाने वारे सुरु होते. दरम्यान सायंकाळी वाºयांचा वेग २२ किमी पर्यंत वाढला होता. ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात जरी वाढ झाली असली तरी, कमाल तापमान स्थिर होते. त्यातच थंड वारे सुरु असल्यामुळे वातावरणात अल्हाददायक गारवा जाणवत होता. बुधवारी वाºयांचा वेगात देखील वाढ होण्याची शक्यता असून, २० ते २५ किमी प्रतीतास या वेगाने जळगावात वारे वाहण्याचा अंदाज आहे.
बुधवारी जिल्ह्यात पावसाचा अंदाजओखी वादळ बुधवारपर्यंत सुरतच्या दिशेने जाण्याचा अंदाज असल्याने, खान्देशातील तीन्ही जिल्हे वादळाच्या परिसरात राहणार आहेत. त्यामुळे बुधवारी जळगाव जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. काही भागात मध्यम पावसाची काही ठिकाणी गाारपीटीचा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तविला आहे. मंगळवारी जळगाव तालुक्यातील काही भागांमध्ये रात्री पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या होत्या.