जळगाव : ‘लोकमत’ दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यात कथा स्पर्धेत कापूसवाडी (ता.जामनेर) येथील युवराज मेघराज पवार यांच्या ‘भूतडी’ या कथेने प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर कविता स्पर्धेत चोपडा येथील बाळकृष्ण सोनवणे यांच्या ‘सौहार्दाचं आकाश’ या कवितेने प्रथम स्थान पटकावले आहे.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’तर्फे प्रकाशित दिवाळी अंकासाठी कथा आणि कविता स्पर्धा घेण्यात येते. याद्वारे नवोदित कवी, लेखक तसेच सर्व स्तरातील घटकांना स्थान मिळावे या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. यंदा या दोन्ही स्पर्धामध्ये नवोदितांसोबतच जुन्या-जाणकार कवी-लेखकांनीही सहभाग घेतला. स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळाला. यात खान्देशासोबतच पुणे, मुंबई, नाशिकमधील स्पर्धकांनीही सहभाग घेतला. कथा स्पर्धेत प्रथम क्रमाकांच्या विजेत्यास १२०० रुपये, द्वितीय विजेत्यास ८०० आणि तृतीय विजेत्यास ६०० रोख बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच कविता स्पर्धेत प्रथम विजेत्यास एक हजार रुपये, द्वितीय व तृतीय विजेत्यास अनुक्रमे ८०० आणि ६०० रुपये रोख बक्षीस मिळणार आहे. याशिवाय या दोन्ही स्पर्धामधून उत्तेजनार्थ प्रत्येकी पाच कथा आणि पाच कविता परीक्षकांनी निवडल्या आहेत. विजेत्यांना लवकरच दिवाळी अंकासह पुरस्कार दिले जाणार आहेत.कथा स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून जळगाव येथील मू.जे. महाविद्यालयातील पदव्युत्तर मराठी विभागाचे प्रा.डाॅ.योगेश महाले, तर कविता स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून निवृत्त शिक्षणाधिकारी तथा ज्येष्ठ कवी शशिकांत हिंगोणेकर यांनी काम पाहिले.
कथा स्पर्धेतील विजेेतेप्रथम- ‘भूतडी’ लेखक- युवराज पवार, कापूसवाडीद्वितीय-‘मास्क आणि ती’ लेखक- रावसाहेब जाधव, चांदवडतृतीय- ‘बुडबुडा’ लेखक- वाल्मीक अहिरे, वडजी, ता.भडगावउत्तेजनार्थ- ‘बैलजोडी’ लेखक- सुनील गायकवाड, कजगाव, ता.भडगावउत्तेजनार्थ- ‘अनोखी आदरांजली’ लेखक- कल्पना संजय बारी, चोपडाउत्तेजनार्थ- ‘हार की जीत?’ लेखक- नीला रत्नाकर रानडे, धुळेउत्तेजनार्थ- ‘कालचक्र’ लेखक- श्रीपाद टेंबे, जळगावउत्तेजनार्थ- ‘दिनकर’ लेखक- दिनेश चव्हाण, चाळीसगाव
कविता स्पर्धेतील विजेेतेप्रथम- ‘सौहार्दाचं आकाश’ कवी- बाळकृष्ण सोनवणे, चोपडाद्वितीय- ‘बाप विठ्ठलासम उभा’ कवी- किरण डोंगरदिवे, मेहकर, बुलडाणातृतीय- ‘माय’ राजेंद्र शंकर रायसिंग, जळगावउत्तेजनार्थ- ‘घाव’ कवी- युवराज पवार, जामनेरउत्तेजनार्थ- ‘गळफास’ कवी-राजेंद्र पारे, चोपडाउत्तेजनार्थ- ‘हरिणीसारखं’ कवी- अरुणकुमार जोशी, जळगावउत्तेजनार्थ- ‘गाळणी’ कवी- जयश्री काळवीट, भुसावळउत्तेजनार्थ- ‘एक पहाट कोरोनामुक्त’ कवी- मयुरी महालपुरे, पाचोरा