भुसावळ, जि.जळगाव : राज्य परिवहन महामंडळातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा एक दिवसीय मेळावा येथील अग्रेसन भवनात झाला. अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष गुलाब शेख होते. यात विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन २३ रोजी जळगाव येथे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय झाला.यावेळी संघटनेचे सचिव सुरेश सूर्यवंशी, अशोक गाडे, के.जी.देशमुख, नंदू चौधरी, विलास जाधव, सुरेश पोद्दार, सजीव वाघुळदे, एच.डी.चौधरी व जळगाव कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीमध्ये सेवानिवृत्त कर्मचाºयांना येणाºया अडचणींवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कर्मचारी अदालत येथे आपल्या अडचणी मांडून या समस्या सोडवण्यासाठी भर असणार आहे. त्याचप्रमाणे उपदानासाठीचा कालावधी १८० दिवसांचा ग्राह्य धरण्यात यावा. सेवानिवृत्त कर्मचाºयांच्या कागदपत्रांची १५ दिवसात पूर्तता करण्यात यावी. महामंडळाकडील रक्कम त्वरित अदा करावी. सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकारी यांचे प्रश्न तीन महिन्यात बैठक आयोजित करून सोडण्यात यावे. उपदानाचे परिपत्रकातनुसार अचूक रक्कम अदा करावी. राष्ट्रीय परिवहन सेवानिवृत्त अधिकारी यांचे १ मे २०१६ पासून करारानुसार फरकाची रक्कम अदा करावी यासह इतर मागण्यांसाठी जळगाव येथे विभाग नियंत्रक कार्यालयासमोर २३ रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचा निर्णय या वेळी झाला.भुसावळ आगाराची कार्यकारणी यावेळी सवार्नुमते निवड करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्ष एम.एम.सरोदे, सचिव आर.आर.सपकाळे, खजिनदार ए.बी.जावळे, सहसचिव टी.पी.पाटील, नंदू महाजन, एन.जी.चौधरी, संघटन सचिव पी.डी.महाजन, उपाध्यक्ष मंजूर हुसेन, वाय.एच.खान, प्रतिनिधी ए.व्ही.नरवाडे, नाजीर शेख व एस.ओ.भंगाळे, ओ.ई.सूर्यवंशी, आर. एच. शहा, भगवान सोनवणे यांचा समावेश आहे.
भुसावळ येथे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मेळावा विविध विषयांवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 4:22 PM
राज्य परिवहन महामंडळातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा एक दिवसीय मेळावा येथील अग्रेसन भवनात झाला.
ठळक मुद्दे२३ रोजी एक दिवसीय धरणे आंदोलनसेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची १५ दिवसात पूर्तता करण्यात यावी