ऑनलाईन लोकमत
गुढे ता. भडगाव, दि.22 : जुवार्डी येथील शाळेच्या खोलीत सेवानिवृत्त मुख्याध्यापक हरी पंडीत पाटील (वय 60) यांनी गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार 22 रोजी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान लक्षात आला. पोलिसांना आत्महत्येनंतर सुसाईड नोट मिळून आली असून त्यात शिक्षक व शालेय समितीच्या अध्यक्षावर आरोप करण्यात आले आहे.
मयत हरी पाटील हे या शाळेचे संचालक होते. शाळाचा दर्जा सुधारावा यासाठी त्यांचे मोठय़ा प्रमाणात प्रय} सुरु होते. ते दोन वषार्पूर्वी लोणी ता. पारोळा येथून सेवानिवृत्त झाल्यावर आपले गाव जुवार्डी येथे रहात होते. एक वषार्पासून ते शाळेत मोफत क्लासेसही घेत असे. त्यांच्या पश्चात 2 मुली, 1 मुलगा व प}ी असा परिवार आहे. मुलगा डॉक्टर असून ते पुण्यात वास्तव्यास आहे.
सुसाईडनोटमध्ये शिक्षक आणि समिती अध्यक्षावर आरोप
जिल्हाधिकारी, न्यायधीश आणि धर्मदाय आयुक्त यांच्या नावाने ही सुसाईड नोट लिहीली आहे. 4 पानांची ही नोट असून यामध्ये म्हटले आहे की, मी पुण्यास मुलाकडे राहतो. 15 दिवसातून गावी येवून मुलांचे मोफत क्लास घ्यायचो. काही शिक्षकांना हे खटकत होते. ‘तुम्हाला शाळेत यायची काय गरज’ असे ते म्हणत. शिक्षक भाऊसाहेब उखा पाटील, शालेय समिती अध्यक्ष वसंत विठ्ठल पाटील हे दोन व्यक्ती आत्महत्येस जबाबदार असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा व संचालक मंडळ तत्काळ बरखास्त असेही यात म्हटले आहे. तसेच अंत्यविधी शाळेच्या आवारात व्हावा तसेच दशक्रिया व गंधुमक्ती पाचव्या दिवशी व्हावी अशी इच्छाही लेखी स्वरुपात व्यक्त केली आहे. दरम्यान वरील दोघांचे मनस्ताप देणारे बोलणेही आपण मोबाईवर रेकॉर्ड केले असल्याचे म्हटले असून शाळेचा शैक्षणिक दर्जा व्यवस्थित नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.