पाचोरा : शहरात २ गावठी कट्टे व ७ जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या ३ सराईत गुन्हगारांना पाचोरा पोलिसांनीे अटक केली असून त्यांच्याविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, ३० आॅगस्ट रोजी पाचोरा शहरातील भडगावरोड वरील नीलम कट्टा येथील सार्वजनिक जागी रात्री १० वाजेच्या दरम्यान विशाल राजेंद्र पाटील रा.शिवाजी नगर यास आरोपी चंद्रकांत सूर्यकांत नाईक,अविनाश सूर्यकांत नाईक व निलेश अनिल सोनवणे (राव) सर्व रा. पाचोरा यांनी लोखंडी चॉपरने सहा वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर ते सर्व जण फरार झाले होते.सदर गुन्हाचा तपास उपअधीक्षक ईश्वर कातकडे, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे, पोलीस उपनिरीक्षक गणेश चौभे, पोलीस नाईक राहुल सोनवणे, राहुल बेहरे, विनोद पाटील, दीपक सुरवाडे, नंदकुमार जगताप, विश्वास देशमुख, किरण पाटील, विनोद बेलदार, वाहन चालक दामोदर सोनार यांच्या पथकाने ेकेला.तपास करताना मिळालेल्या माहितीवरुन आरोपींना अटक करून त्यांच्या कडून माहिती घेत गुन्ह्यात वापरल्या लोखंडी चॉपरसह दोन गावठी कट्टे व सात जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत.
२ गावठी कट्टयांसह ७ काडतुसे हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2019 10:04 PM