जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5050 रुपये प्रतिक्विंटल हमीभावात तूर खरेदी केंद्र सुरू झालेले असले तरी या केंद्रात शेतक:यांना तूर स्वच्छ करून आणण्याची सक्ती केली जात आहे. त्यासाठी प्रतिक्विंटल 60 रुपये खर्च लागत असून, अनेक शेतक:यांना आपली तूर घरी विक्री न करताच परत न्यावी लागत असल्याची स्थिती आहे. तुरीचा हमीभाव 5050 रुपये असला तरी खाजगी व्यापारी सध्या 4500 ते 4700 रुपये प्रतिक्विंटल या दरात खरेदी करीत आहेत. संकरीत तुरीला यापेक्षा कमी दर दिला जात आहे. अशा स्थितीमध्ये शेतक:यांना फक्त शासकीय तूर खरेदी केंद्राचा आधार मिळू शकतो. पण या शासकीय तूर खरेदी केंद्रात नियमांच्या नावाने शेतक:यांना वेठीस धरले जात आहे. राज्यमंत्र्यांकडे तक्रारयाबाबत आसोदे व इतर ठिकाणच्या काही शेतक:यांनी सहकार राज्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे. खरेदी केंद्र नावालाच आहे. यातच तूर खरेदीसाठी शेतक:यांनी केंद्रातील अधिका:यांकडे पाठपुरावा केला तर केंद्रसंचालक खरेदी केंद्र बंद करण्याच्या धमक्या देतात. तसे पत्रच खरेदी केंद्राने बाजार समितीला दिले असून, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर खरेदी केंद्र बंद करण्याचे त्यात म्हटले आहे. भोकर,आसोद्याच्या शेतक:यांची तक्रारखरेदी केंद्रात तूर 60 रुपये प्रतिक्विंटल असा खर्च करून स्वच्छ करून नेऊनही केंद्रात नियमांच्या नावाखाली तुरीची खरेदी केली नाही. यामुळे भोकर येथील शेतक:यांना जवळपास 18 क्विंटल तूर परत न्यावी लागली. असाच वाईट अनुभव आसोदे व परिसरातील शेतक:यांना या शासकीय तूर खरेदी केंद्रामध्ये आला.
तूर खरेदी केंद्रातून परतवले
By admin | Published: February 10, 2017 12:48 AM