जळगाव : निवडणूक काळात भरारी पथकांनी संशयावरून सुमारे २३ लाखांची रोकड व ५ किलो चांदी पकडली होती. ही रक्कम मतदारांना वाटपासाठी नसल्याची खात्री झाल्यानंतर संबंधितांना ती परत करण्यात आली. निवडणूक काळात मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी पैशांचा वापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघांमध्ये भरारी पथक नेमण्यात आलेले होते.या पथकाकडून वाहनांची तपासणीही केली जात होती. त्यात रावेर लोकसभा मतदारसंघात १३ लाख १४ हजार ८०० रूपये तर जळगाव मतदार संघात ९ लाख ८० हजारांची रोकड व ५ किलो चांदी जप्त करण्यात आली होती.जिल्हास्तरीय कॅश रिलीज समितीने संबंधितांकडून या रक्कमेच्या वापराबाबतचे पुरावे तपासून ही रक्कम मतदारांना वाटपासाठी नसल्याची खात्री करून परत केली आहे.
निवडणूक काळात जप्त केलेली २३ लाखांची रोकड संबंधितांना परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 9:40 AM