जळगाव : गेल्या आर्थिक वर्षात ई फेरफार प्रणालीवरून दस्ताऐवज वितरीत करण्यात आले. त्यानुसार जिल्हाभरात एप्रिल २०२० ते मार्च २०२१ पर्यंत २८ लाख ३ हजार ९७५ दस्ताऐवजाचे वितरण करण्यात आले. त्यातून शासनाला एक कोटी चाळीस लाख १९ हजार ८७५ रुपये एवढा महसुल शासनाला मिळाला असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांनी दिली.
यात नागरिकांनी २० लाख ८१ हजार ३२ सातबारा उतारे काढले तर आठ अ ची संख्या ही ४ लाख ८५ हजार ६४२ आणि फेरफार उताऱ्यांची संख्या २ लाख ३७ हजार ३०१ एवढी आहे.. त्याशिवाय दोन लाखांपेक्षा जास्त उतारे हे सरकारी कामांसाठी काढण्यात आले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाच्या महसूल विभागाचे सातबारा संगणकीकरणाचे काम सुरू होते. हे काम आता मार्च अखेरीस पूर्णत्वाच्या टप्प्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण १२ लाख ५ हजार सातबारा उतारे आहेत. त्यातील फक्त दोन ते अडीच हजार उतारे हे डिजिटल साईन होण्यात अडचणी येत आहेत.
डिजिटल सातबारा काढल्यावर त्यासाठी नागरिकांना तलाठीकडुन सही शिक्का घेण्याची गरज पडत नाही. त्याची फी ही फक्त १५ रुपये आहे. हे सातबारा ऑनलाईन उपलब्ध आहेत. याच दस्ताऐवजाच्या वितरणातून जळगाव जिल्ह्यातून शासनाला एक कोटी चाळीस लाख रुपयांचा महसुल मिळाला आहे.
नागरिकांसाठी दस्ताऐवज वितरण
तालुका निहाय आकडेवारी
तालुका एकुण दस्तावेज
जळगाव २९११५३
चोपडा १७६९६९
अमळनेर १५३९८२
पारोळा २१६८६८
भडगाव १५४२७०
चाळीसगाव ३२६७१६
पाचोरा २३२१९८
जामनेर १७३८७२
यावल १७५०१०
रावेर २५७१२१
मुक्ताईनगर १४७०३२
बोदवड १०००९६
भुसावळ १३७०८९
एरंडोल १६४१४२
धरणगाव ९७४५७
एकुण २८०३९७५