लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनानंतरच्या काळात खरेदी विक्रीच्या व्यवहारांना आता वेग मिळत आहे. त्यामुळे आता मार्च महिन्याअखेर दस्त नोंदणी करून घेणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे.. मार्च महिना अखेर ९५०५ दस्त नोंदणी झाली. त्यामुळे या महिन्यात जळगाव जिल्ह्याला तब्बल १७ कोटींचे मुद्रांक शुल्क मिळाले आहे.
या चालू आर्थिक वर्षात कोरोनामुळे सुरूवातीच्या महिन्यात मोठा फटका बसला होता. लॉकडाऊनमुळे व्यवहार बंदच होते. मात्र त्यानंतर हळुहळु व्यवहार सुरू झाले. मे महिन्यात काही प्रमाणात व्यवहार होत होते. मात्र शासनाने डिसेंबर महिन्यात व्यवहार करणाऱ्यांना तीन टक्के सुट देण्यात आली होती. त्यानंतर देखील दस्त नोंदणी आणि मुद्रांक शुल्क महसुल मोठ्या प्रमाणात शासनाला मिळाला आहे. जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांनी खरेदीविक्रीसाठी मार्च अखेर नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. ३१ मार्चपर्यंत मुद्रांक शुल्क भरल्यास पुढील चार महिने दस्त नोंदणीस राहणार सवलत शासनाने जाहीर केली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दस्त नोंदणी करण्यात आली आहे.
राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गतवर्षी खरेदीदारांना मालमत्तांच्या व्यवहारांसाठी प्रोत्साहन देऊन रिअल इस्टेटलाही चालना देण्यासाठी १ सप्टेंबरपासून ३१ डिसेंबर पर्यंत मुद्रांक शुल्कात ३ टक्के तर १ जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत २ टक्के सवलत दिली आहे.
पहिल्या टप्यातील सवलत योजनेला जळगाव जिल्ह्यातही उत्तम प्रतिसाद मिळाला होता. यात यात डिसेंबर महिन्यात १३ ७८४ दस्त नोंदणी करण्यात आली होती. या दुसरा टप्पा देखील आता संपला आहे. त्यात तब्बल २८ हजारांच्या वर नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती सह मुद्रांक जिल्हा निबंधक वर्ग २ सुनिल पाटील यांनी दिली.
दस्त नोंदणी मुद्रांक शुल्क वसुली
जानेवारी ९१४६ १८.२६ कोटी
फेब्रुवारी ९५०५ १५.६९
मार्च ९५०५ १७ कोटी