जळगाव : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित १ आॅक्टोबर रोजी होणाºया पाणी आरक्षण बैठकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्व तयारी बैठक झाली. यामध्ये बहुळा प्रकल्पात पाणीसाठी नसल्याने त्यावरील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी काय उपाययोजना करता येऊ शकतात, या विषयी चर्चा करण्यात आली. या सोबतच मन्याड, बोरी, अंजनी, तोंडापूर या धरणांबाबतही चर्चा करण्यात आली.१ रोजी पाणी आरक्षण बैठक होणार असून त्याच्या पूर्वतयारी साठी झालेल्या या बैठकीस अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, विकास लाडवंजारी यांच्यासह सिंचन विभाग, जिल्हा परिषदेचे अधिकारी, जिल्ह्यातील नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.बहुळा प्रकल्पात पाणी नसल्याने त्यावरील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांवर परिणाम होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या योजनांविषयी काय करता येऊ शकते, या विषयी चर्चा होऊन त्या बाबत पालकमंत्री निर्णय घेतील, असे ठरविण्यात आले. जिल्ह्यासाठी मोठे प्रकल्प असलेल्या हतनूर धरणात १०० टक्के, वाघूर धरणात ४८ टक्के व गिरणा धरणात ४८ टक्के जलसाठा असल्याने ही दिलासादायक बाब आहे. मात्र तोंडापूर धरणातही कमी साठा असून मन्याड, अंजनी, बोरी यांच्यातही पाहिजे तेवढा साठा नसल्याचा मुद्दा मांडण्यात आला.
जळगाव जिल्ह्यातील बहुळा प्रकल्पात ठणठणात, पाणीपुरवठा योजनांच्या उपाययोजनेचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:13 PM
पालकमंत्र्यांच्या उपस्थित होणाऱ्या पाणी आरक्षण बैठकीची पूर्व तयारी
ठळक मुद्दे ग्रामीण पाणीपुरवठा योजनांवर परिणामतोंडापूर धरणातही कमी साठा