यावल, जि.जळगाव: तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती असल्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मस्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी मत व्यक्त करत मंगळवारी मंत्रीमंडळ समितीसमोर तसा अहवाल सादर करण्यात येणार आहे. दुष्काळी स्थितीत तालुक्यास कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाही पंचायत समितीत सोमवारी घेतलेल्या आढावा बैठकीत दिली. आमदार हरिभाऊ जावळे, अपर जिल्हाधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर प्रमुख होते.येथील पंचायत समितीच्या सभागृहात मंत्री महादेव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील दुष्काळ स्थितीबाबत आढावा बैठक पार पडली. प्रसंगी जानकर यांनी तालुक्यातील यावल, फैजपूर या शहरी भागासह ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणेकडून पिण्याच्या पाण्याचा तर पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाकडून पशुखाद्याचा, कृषी विभागाकडून खरीप हंगामाचा आढावा घेतला. अधिकारी वर्गाकडून तसेच विधी राजकीय पक्ष आणि नागरिकांकडून मिळालेल्या आढाव्यानुसार तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती असल्याचे मत जानकर यांनी व्यक्त केले. तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तसेच गुरांच्या चाऱ्याची टंचाई भासू देणार नसल्याचे सांगत वेळप्रसंगी छावण्या उभारल्या जाणार असल्याचे सांगून त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही जानकर यांनी दिली.अधिकारी वर्गास समजदुष्काळी स्थिती असल्याने अधिकाºयांनी मुख्यालयातच थांबावे, वीज वितरण कंपनीने बिलाअभावी कोणत्याही शेतकºयाची वीज खंडित करू नये, धिस इज माय आॅर्डर असे सांगून तोडल्यास कारवाईस सामोर जावे अशी समज दिली. पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ.बढे यांनी चुकीची माहिती सादर केल्यावरून त्यांना शेतकºयांना खºया अर्थाने वाचवणारे पशुसंवर्धन विकास विभाग असताना तुम्हाला तालुक्यातील उपलब्ध चाºयाची व लागणाºया चाºयाची माहिती देता येत नाही, जी देता ती चुकीची देता, असे सांगत त्यांना चांगलेच खडसावले.बैठकीत आमदार हरिभाऊ जावळे, जि.प. सदस्य रवींद्र पाटील, जि.प.चे काँग्रेसचे गटनेते प्रभाकर सोनवणे, रा.कॉ.चे ताुलकाध्यक्ष मुकेश येवले, पं.स.उपसभापती उमाकांत पाटील, बाजार समितीचे माजी सभापती नारायण चौधरी, पं.स.सदस्य दीपक पाटील, शेखर पटेल यांनी माहिती दिली.तालुक्यात वनविभागाच्या हद्दीत असलेल्या पाझर तलावाचा गाळ शेतकºयांना काढून द्यावा. गाळ काढला तर त्यात पाणीसाठा होईल, असे सांगत प्रजा सुखी तर राजा सुखी, असे म्हणत गाळमुक्त तलाव शासनाचे धोरण असल्याचे सांगून तुम्हाला काही कायदेशीर अडचण असेल तर उद्या मुख्यमंत्री व वनमंत्री यांच्यासोबत बोलणी करून तुम्हाला त्याबाबतचे उद्या सायंकाळी चार वाजेपर्यंत आदेश पारीत करण्याचे वनविभागास सांगितले. बैठकीस प्रांताधिकारी डॉ. अजीत थोरबोले, सर्व शासकीय यंत्रणा प्रमुख, तालुक्यातील जि.प. सदस्य, पं.स.सदस्य, सरपंच, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीनंतर जानकर यांनी हिंगोणा, आमोदा, भोरटेक, अकलूद शिवारातील खरीप हंगामाअंर्गत कपाशि, तूर, ज्वारी, केळी यासह विहिरींच्या पातळीची पाहणी केली. दरम्यान त्यांनी आस्थेवाईकपणे शेतकºयांची बोलणी करून विविध विषयासंदर्भात माहिती घेतली.
यावल येथे पशुसंवर्धन मंत्र्यांच्या उपस्थितीत दुष्काळी स्थितीबाबात आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 10:18 PM
यावल तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती असल्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मस्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी मत व्यक्त करत मंगळवारी मंत्रीमंडळ समितीसमोर तसा अहवाल सादर करण्यात येणार आहे. दुष्काळी स्थितीत तालुक्यास कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाही पंचायत समितीत सोमवारी घेतलेल्या आढावा बैठकीत दिली.
ठळक मुद्देमंगळवारी मंत्रीमंडळ समितीसमोर तसा अहवाल सादर करण्यात येणारमंत्री महादेव जानकर यांच्याकडून दुष्काळग्रस्त भागाची पाहणी