शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

जळगावात अनुदानासाठी फिरवाफिरव : मायबाप सरकार अनुदानाचं तेवढं बघा, शेतकऱ्यांची आर्त हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 11:48 AM

कृषी विभागाची चालढकल

ठळक मुद्देतीन वर्षांपासून अनुदान मिळेना कार्यालयाकडे पायपीट

विलास बारीजळगाव : शेतीचे उत्पन्न आणि त्यावर होणारा खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी आत्महत्या होत आहेत. शेतकरी सबलीकरणासाठी शासनाकडून प्रयत्न होत असताना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत तयार केलेल्या पॅक हाऊसच्या अनुदानासाठी शिरसोली येथील शेतक-याला तब्बल तीन वर्षांपासून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे पायपीट करावी लागत आहे. न्याय देण्याच्या भूमिकेत असलेल्या कृषी विभागाकडूनच शेतकºयावर अन्याय होत असताना ‘मायबाप सरकार अनुदानाचं तेवढं बघा’अशी आर्त हाक या शेतकºयाकडून दिली जात आहे.शिरसोली येथील पुंडलिक बाबूराव खलसे (बारी) यांनी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत २०१४/१५ मध्ये काढणी पश्चात व्यवस्थापन घटकांतर्गत पॅक हाऊस उभारणीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार या कार्यालयाकडून २२ जानेवारी २०१५ रोजी पूर्व संमती देण्यात आली आहे.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून पॅक हाऊसच्या कामाला पूर्वसंमती मिळाल्यानंतर पुंडलिक खलसे यांनी फळपिक व फुलांच्या पिकांच्या पॅक हाऊसच्या कामाला सुरुवात केली. त्यानुसार तीन लाख १० हजार रुपयांचे बांधकाम, एक लाखांची मशनरी व २५ हजारांचे साहित्य असा चार लाख ३५ हजारांचा खर्च करीत प्रकल्पाची उभारणी केली.तीन वर्षांपासून अनुदान मिळेनाअनुदानासाठी प्रस्ताव सादर केल्यानंतर या शेतकºयाने कृषी विभागाकडे वारंवार फेºया मारल्यानंतरही रक्कम मिळाली नाही. शेवटी ११ जानेवारी २०१८ रोजी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी या चौघांनी प्रकल्पाची पाहणी केली. त्यात निवडलेली जागा, बांधकाम व पिक समुहाची लागवड योग्य असल्याचा अहवाल देत खर्च झालेल्या रकमेपैकी एक लाख ७२ हजार ४५५ रुपयांच्या अनुदानाची रक्कम देण्याबाबत शिफारस करण्यात आली. अनुदानासाठी ते कृषी साहाय्यक ते सहकार राज्यमंत्री या सर्वांना भेटले. मात्र त्यानंतरही अनुदानाची रक्कम मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहे.एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत पॅक हाऊससाठी अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकºयाच्या प्रस्तावाबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून माहिती घेतो. पॅक हाऊसचे काम पूर्ण झाले असेल तर शेतकºयाला अनुदानाची रक्कम दिली जाईल. यात टाळाटाळ करणाºयांची चौकशी केली जाईल.- सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्रीपॅक हाऊससाठीचे प्रकरण २०१४/१५ या वर्षातील आहे. या प्रकरणाबाबत आपल्या माहिती नाही. माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.-संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून पॅक हाऊससाठी पूर्वसंमती मिळाल्यानंतर काम सुरु केले. त्यावर चार लाख ३५ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. तीन वर्षांपासून अनुदानासाठी सर्व अधिकाºयांकडे फिरलो आहे. मात्र मुद्दाम टाळाटाळ केली जात आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी.-पुंडलिक खलसे, शेतकरी, शिरसोली.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव