जळगाव : भरधाव वेगाने मागून येणा:या मॅटेडोअरचा कट लागल्याने मालवाहू रिक्षा थेट उड्डाणपुलावरुन शंभर ते दीडशे फुट खाली कोसळल्याची घटना गुरुवारी दुपारी दोन वाजता पिंप्राळा पुलाजवळ घडली.या अपघातात सात ते आठ पलटी घेतल्याने रिक्षाचे दोन तुकडे झाले. दैव बलवत्तर म्हणून रिक्षा चालक व त्याचा सहकारी बालंबाल बचावले. मॅटेडोअर चालकाने रस्त्याने येताना दोन ते तीन वाहनाना कट मारला होता, त्यामुळे तो या अपघाताच्या वेळी तेथे न थांबता पसार झाला.गणेश कॉलनीतील पालीवाल टेन्ट हाऊसची रिक्षा (क्र.एम.एच.19 एस.0884) घेवून चालक कैलास दामू सावळे (रा.हुडको, पिंप्राळा)व त्याचा सहकारी अनिल शिरसाठ हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासमोर असलेल्या महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमातील टेन्ट हाऊसचे साहित्य घ्यायला गेले होते. तेथून परत गणेश कॉलनीत येत असताना दुपारी दोन वाजेच्या सुमारास महामार्गावर पिंप्राळा पुलाजवळ मागून भरधाव वेगाने येणा:या मेटॅडोअरचा कट लागला, त्यात रिक्षा थेट पलटी घेत खाली कोसळली. पलटी घेत असताना कैलास व अनिल या दोघांनी जीव मुठीत घेवून स्वत:ला सावरले. झाडाझुडपांमध्ये अंगावर दगड व काटे लागले. रिक्षाचा पुढील भाग व ट्रॉली तुटून वेगळी झाली. त्यात तिचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.बालंबाल बचावले दोघंया अपघातात चालक कैलास याच्या पायाला मुका मार लागला आहे तर अनिलला किरकोळ दुखापत झाली.दोन्ही बालंबाल बचावले आहे. तसेच खालच्या रस्त्यावर सुदैवाने त्यावेळी एकही वाहन अथवा व्यक्ती रस्त्यावरुन वापरत नव्हता, अन्यथा त्यांच्या अंगावरच रिक्षा आली असती व मोठी घटना घडली असती. अपघाताची माहिती मिळताच रिक्षा व टेन्ट हाऊचे मालक नंदू पालीवाल, माजी नगरसेवक मंगलसिंग पाटील, केतन पाटील यांनी घटनास्थळ गाठून चालकाला दवाखान्यात हलविले. वाहतुकीचा खोळंबा महामार्गावर व पिंप्राळा रस्त्याला लागून महामार्गाला जोडणा:या रस्त्यावर वाहतुकीची खोळंबा झाला होता. जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे बीट मार्शल रवी तायडे व मनोज कोळी यांनी घटनास्थळ गाठून वाहतुक सुरळीत केली व अपघातग्रस्त रिक्षा इतरत्र हलविली. दरम्यान, महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. बुधवारी वराड गावाजवळ भरधाव वेगाने जाणा:या ट्रकने विद्यार्थिनीचा बळी घेतला होता. त्यानंतर दुस:याच दिवशी हा अपघात झाला.
मेटॅडोअरचा धक्क्याने रिक्षा पुलावरुन कोसळली
By admin | Published: January 06, 2017 1:21 AM