जळगाव : घरी फोन करण्याच्या बहाण्याने प्रवाश्याने रिक्षा चालकाला मोबाईल मागून तो लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी गजानन भरत चव्हाण (रा़ रामेश्वर कॉलनी) यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़चव्हाण यांनी नंदिनीबाई विद्यालयाजवळून त्यांनी एका प्रवाशाला रिक्षात बसविले़ नंतर गोलाणी मार्केटजवळील नरेंद्र मेडीकलजवळ प्रवाशाने रिक्षा थांबविण्यास सांगून घरी फोन करायचा आहे, असे सांगून रिक्षा चालक गजानन यांच्याकडून घेतला़ प्रवासी फोनवर बोलत असल्याचे पाहून गजानन हे बाजूलाच पाणी पिण्यासाठी गेले़ तोपर्यंत प्रवासी मोबाईल घेऊन पसार झाल्याचा दिसून आला़ त्याचा शोध घेतला असता तो दिसून आला नाही़ अखेर ६ महिन्यांनी तोच प्रवासी गजानन यांना जुन्या बसस्थानकाजवळ आढळून आला़ त्यांनी मोबाईलची विचारणा केली असता मला काहीच माहिती नसल्याचे त्या प्रवाशाचे सांगितले़ नंतर त्याने जफर शेख राजू (वय-२८, रा़ जामनेर) असे नाव सांगितले़ रिक्षाचालकाने त्वरित त्यास रिक्षात बसवून शहर पोलीस ठाण्यात नेले़ दरम्यान, शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तसेच संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़
प्रवाशाने लांबविला रिक्षा चालकांचा मोबाईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 10:44 PM