अमळनेर : जादा प्रवासी घेऊन बिजासनीदेवीच्या दर्शनाला जाणारी भाविकांची रिक्षा उलटून 10 प्रवासी जखमी झाले. ही घटना 4 रोजी पहाटे पावणेदोन वाजेच्या सुमारास घडली. संतोष पाटील (रा.वलवाडी, सेंधवा) हा आपल्या रिक्षात टाकरखेडा येथून प्रवासी घेऊन बिजासनी गडावर दहीवदमार्गे जात होता. दहीवद फाटय़ावर चोपडय़ाकडे वळण घेताना रिक्षा उलटली. यात संजय भास्कर पाटील, सुमनबाई गयभू पाटील, मंगलाबाई राजेंद्र पाटील, मनीषा नारायण पाटील, वेणूबाई नथ्थू पाटील (सर्व रा.टाकरखेडा), विशाल भटू पाटील, ज्ञानेश्वर भटू पाटील, रोशनी नारायण पाटील (सर्व रा.मंगरूळ), झुलाल विठ्ठल पाटील (रा.कंडारी), अलकाबाई संजय पाटील (रा.तामसवाडी) हे जखमी झाले. जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी विशाल पाटील, अलका पाटील, मंगलाबाई पाटील गंभीर जखमी असल्याने त्यांना 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने धुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संजय पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून अमळनेर पोलिसात वाहनचालक संतोष पाटील याच्याविरुद्ध भादंवि 279, 337, 338, मोटार वाहन कायदा 184 प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे. तपास हवालदार प्रभाकर पाटील करीत आहेत. (वार्ताहर)
रिक्षा उलटून 10 जण जखमी
By admin | Published: April 05, 2017 12:28 AM