अकलेचे दिवाळे : मक्तेदाराच्या कर्मचा:यांवर देखरेखीसाठी लिपिक व शिपायांची टीम
जळगाव,दि.12- मालमत्ता कर सव्रेक्षणासाठी मक्ता दिलेल्या मक्तेदाराकडून घरांना क्रमांक देण्याचे काम पूर्ण झालेल्या ठिकाणी मालमत्तांची प्रत्यक्ष मोजणी करण्याचे काम सुरू करण्यात येणार असून त्या कामावर देखरेखीसाठी मनपा उपायुक्तांनी मनपा कर्मचा:यांच्या 10 टीम केल्या आहेत. मात्र केवळ लिपिक व शिपायांचाच त्यात समावेश असून मक्तेदाराच्या कर्मचा:यांनी केलेली मोजणी व मोजलेल्या खोल्यांची संख्या बरोबर असल्याची खात्री करून त्या फॉर्मवर त्यांनी स्वाक्षरी करावयाची आहे. त्यामुळे जर काही त्रुटी राहिल्याचे भविष्यात लक्षात आले तर मक्तेदार निघून गेलेला असल्याने त्याचे खापर तांत्रीक ज्ञान नसलेल्या मनपा कर्मचा:यांवर फुटणार आहे.
मनपाने शहरातील मालमत्तांचे सव्रेक्षण दर चार वर्षानी करून त्यानुसार कर आकारणी करणे बंधनकारक आहे. मात्र मनपा प्रशासनाच्या दूर्लक्षामुळे हे काम गेल्या 12 वर्षात झालेच नाही. त्यामुळे अनेक नव्याने झालेली बांधकामे तसेच काही ठिकाणी झालेली वाढीव बांधकामे यावर कर आकारणीच झालेली नसल्याने मनपाचे कोटय़वधींचे उत्पन्न बुडत आहे. त्यामुळे मनपाने मालमत्ता कराचे सव्रेक्षण करण्यासाठी स्थापत्त कन्सल्टन्सी (इं ) प्रा.लि. अमरावती यांना मक्ता दिला आहे. या मक्तेदाराकडून ड्रोनद्वारे सव्रेक्षण करून नकाशा केला जाणार असून. प्रत्यक्षातही प्रत्येक मालमत्तेचे मोजमाप करून कर आकारणी केली जाणार आहे. त्यासाठी घरांना क्रमांक टाकण्याचे काम मक्तेदाराकडून हाती घेण्यात आले. मात्र त्यातही मनपाचे कर्मचारी कॉलन्या व रस्ते सांगण्यासाठी सोबत दिले होते. त्यापैकी अनेक प्रभागातील क्रमांक टाकण्याचे काम पूर्ण झाल्याने आता प्रत्यक्ष मोजणीचे काम बुधवार पासून हाती घेण्यात येणार आहे. त्या मोजमापाच्या कामासाठी मक्तेदाराने 10 टीम केल्या असून त्यावर देखरेखीसाठी मनपानेही 13 कर्मचारी नियुक्त केले आहेत. मात्र त्यापैकी 7 लिपिक तर 6 शिपाई आहेत. मोजणीच्या कामावर देखरेखीसाठी सव्र्हेअरच आवश्यक असताना अथवा तांत्रिक ज्ञान असलेल्या अभियंत्यांवर ही जबाबदारी सोपविणे आवश्यक असताना लिपिक व शिपायांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.