शेती-मशागतीसाठी नांगर, मैद, कुळव, केणी, पाभर, कोळपियांसारखी अवजारे व विळा, कोयता, खुरपे, कुदळ, टिकाव, दोरखंड, चऱ्हाट, वखर, पाभंर, गोली, लोखंडी पास, पेरणीचे चाडे, दुसर, जोते, बैलाचे मुस्के, कुऱ्हाड इत्यादी साधने शेतकामासाठी वापरण्यात येतात.
भाववाढीचा फटका
शासनाकडून शेतीपयोगी वस्तूवरदेखील जीएसटीसारखे टॅक्स लावण्यात आल्याने या वस्तूची भाववाढदेखील मोठ्या प्रमाणावर झाली आहे. सध्या शेती मशागतीसाठी व शेतीपयोगी वस्तूमध्ये लोखंडाचा वापर जास्त प्रमाणात असल्याने या वस्तूचे भाव वधारले आहेत.
बाजारात परिणाम
वाकोद शनिवार बाजारात परिसरातील जवळपास ३० ते ३५ खेड्यावरील लोक हजेरी लावत असतात. हा भाग मुख्यतः शेतीवर अवलंबून असल्याने शेतकरी संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मागील वर्षापेक्षा यंदा शेतीपयोगी वस्तूची भाववाढ झाल्याने शेतकरीवर्गाकडून पाहिजे, तशी खरेदी होत नसल्याची व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मागीलवर्षी ७० ते ८९ रुपये किलो दराने विकली जाणारी लोखंडी पास यंदा भाववाढीमुळे ज्यादा दराने विकली जात आहे. २० रुपयाला मिळणारे खुरपे ३५ ते ४० रुपये दराने विकले जात आहे. दोरखंड व चऱ्हाट यांच्यादेखील १५ ते २० रुपये किलो दराने वाढ झाली आहे.
दरवर्षाप्रमाणे शेतकऱ्यांना लागणारा शेतीपयोगी माल यंदादेखील पाहिजे तेवढा दुकानात आणला होता. मात्र अनेक वस्तूंमध्ये मोठी भाववाढ झाल्याने खपाचे प्रमाण घटलेले आहे. शासनाकडून या वस्तूवर लावलेले कर कमी झाल्यास भाव स्थिर राहू शकतात.
-शेख लुकमान शेख सुबान, शेतअवजारे व्यापारी
शेती वस्तू व अवजारांची दरवर्षी काही ना काही तूट फूट होते किंवा हरविले जाते. शेती मशागतीवेळी यांची मोठी गरज भासते. मात्र विकत घेण्यासाठी गेलो असता सगळ्यात जास्त भाववाढ यंदा दिसून आली. अवजारे विकत न घेता जुनेच दुरुस्त करून वापरात आणणार आहे.
-ईश्वर कोळी, शेतकरी
===Photopath===
190621\19jal_11_19062021_12.jpg
===Caption===
वाकोद आठवडे बाजारात शेती उपयोगी अवजारांची वाढती मागणी