पहूर, ता.जामनेर, जि.जळगाव : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या दशक्रिया विधीसोबतच गंधमुक्तीचा कार्यक्रम पहूर येथे ग्रामस्थ व स्थानिक भाजपा पदाधिकाºयांंच्या वतीने शनिवारी पवित्र केवडेश्वर महादेव मंदिर करण्यात आला. विशेष म्हणजे विधीवत पूजन करून काही जणांनी मुंडण केले. याप्रसंगी ज्येष्ठ पदाधिकारी शांताराम लाठे यांच्या हस्ते प्रमुख विधी करण्यात आला. हेमंत जोशी यांनी पौराहित्य केले. या वेळी उपस्थितांच्या हस्ते पिंडदान करण्यात आले.यादरम्यान लेले विद्यालयाचे सचिव डॉ. विजय लेले, उपाध्यक्ष साहेबराव देशमुख, माजी जि.प.सदस्य राजधर पांढरे, रोहयोचे तालुका अध्यक्ष समाधान पाटील, अॅड.एस.आर.पाटील, शरद पांढरे, सलीम शेख गणी, फिरोज तडवी, अरूण घोलप, ललित लोढा, संतोष चिंचोले, गोकुळ कुमावत, ज्ञानेश्वर पांढरे, प्रभाकर कुमावत, वासुदेव घोंगडे, लक्ष्मण गोरे, सुभाष जोशी, नयन जोशी, अमोल कुमावत, शरद बेलपत्रे, ज्ञानेश्वर पवार, संदीप बेढे, मोहन जोशी राकेश भट, राहुल घरोटे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. विधीनंतर वाघूर नदीत कार्यकर्त्यांसह पदाधिकार्यांनी पिंड विसर्जन केले.
अटलजींच्या दशक्रियेनिमित्त विधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 5:45 PM