आॅनलाईन लोकमतजळगाव दि,३१ : चिंचोली येथून तमाशा पाहून घरी पायी परत येत असताना अज्ञात वाहनाने चिरडल्याने गोपाळ रामदास चव्हाण (वय ४५, रा.उमाळा, ता. जळगाव, मुळ रा.चिंचखेडा, ता.जामनेर) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री बारा वाजता उमाळा गावाजवळ महामार्गावर घडली. चव्हाण हे ट्रॅक्टरवर चालक म्हणून कामाला होते.उमाळा येथून जवळच असलेल्या चिंचोली, ता.जळगाव येथे शनिवारी तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी चव्हाण हे तेथे गेले होते. थोळा वेळ थांबल्यानंतर तेथून घरी पायीच परत येत असताना उमाळा शिवारात भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. डोक्यावरुन टायर गेल्याने चव्हाण हे जागीच गतप्राण झाले. यावेळी तमाशा पाहून जाणाºया परिसरातील नागरिकांना रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळून आल्याने त्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली. रात्रपाळीच्या ड्युटीला असलेले गोविंदा पाटील व परेश जाधव हे दोन्ही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने त्यांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. चव्हाण यांच्या पश्चात पत्नी अनिता, मुलगा उमेश, अमोल व विवाहीत मुलगी पुजा असा परिवार आहे.
औरंगाबाद रस्त्यावर अज्ञात वाहनाने उमाळ्याच्या ट्रॅक्टर चालकाला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 1:10 PM
चिंचोली येथून तमाशा पाहून घरी पायी परत येत असताना अज्ञात वाहनाने चिरडल्याने गोपाळ रामदास चव्हाण (वय ४५, रा.उमाळा, ता. जळगाव, मुळ रा.चिंचखेडा, ता.जामनेर) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री बारा वाजता उमाळा गावाजवळ महामार्गावर घडली. चव्हाण हे ट्रॅक्टरवर चालक म्हणून कामाला होते.
ठळक मुद्देउमाळा गावाजवळील घटना तमाशा पाहून परत येत असताना झाला अपघातडोक्यावरुन गेले टायर