मुक्ताईनगर : तालुक्यातील डोलारखेडा येथे भारत निर्माण योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे काम तब्बल आठ वर्षापासून रखडले असून वारंवार पाठपुरावा करूनही काम पूर्ण केले जात नाही, काम त्वरित पूर्ण करण्यात यावे व या योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी या मागणीसाठी डोलारखेडा ग्रामस्थांनी मुक्ताईनगर कुºहा मार्गावर गुरूवारी एक तास रास्ता रोको आंदोलन केले.दरम्यान, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उप अभियंत्याकडून वीस दिवसात योजनेचे काम सुरू करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.डोलारखेडा या गावाचा सुकळी ग्रुप ग्रामपंचायत मध्ये समावेश असून वर्ष २०११-१२ मध्ये या गावासाठी भारत निर्माण योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. सदर योजना राबविणे कामी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली होती मात्र समितीने जाणिवपूर्वक दुर्लक्ष करून गावाची पाणीपुरवठा योजना रखडवली, असा आरोप आहे. सदर योजनेअंतर्गत गावात पाइपलाइन टाकण्याचे काम आठ दिवसात पूर्ण न झाल्यास १६ आॅगस्टपासून समस्या सुटेपर्यंत डोलारखेडा येथून पुढे जाणारा रस्ता बंद करून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला होता.याबाबत ९० ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले होते. दरम्यान, मुदत आणि आंदोलनाचा इशारा देऊनही याबाबत कार्यवाही न झाल्यामुळे गुरुवारी सकाळी अकरा वाजता डोलारखेडा ग्रामस्थांनी मुक्ताईनगर कुºहा मार्गावर रास्ता रोको सुरू केले.
पाणी पुरवठा योजनेचे काम रखडल्याने डोलारखेडा येथे रस्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 2:16 AM
तब्बल आठ वर्षापासून पाणी पुरवठा योजनेचे काम रखडले असून वारंवार पाठपुरावा करूनही काम पूर्ण केले जात नाही, काम त्वरित पूर्ण करण्यात यावे व या योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी या मागणीसाठी डोलारखेडा ग्रामस्थांनी मुक्ताईनगर कुºहा मार्गावर गुरूवारी एक तास रास्ता रोको आंदोलन केले.
ठळक मुद्देयोजनेची अंमलबजावणीवर देखरेख करणाºया समितीवर दूर्लक्षाचा आरोपउपअभियंत्याने आश्वासन दिल्याने आंदोलन मागे