तोंडापूर, ता.जामनेर, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या मांडवे बुद्रूक ते ढालगाव दरम्यान पुलाचा सिमेंट पाईप फुटून मोठा खड्डा पडल्याने वाहनांना ये जा करण्यासाठी मोठी कसरत करत करावी लागत आहे.एक महिना होऊनदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाने याची अद्याप दखल घेतलेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही कर्मचारी या रस्त्याकडे फिरकूनही पाहत नाही. रात्रीच्या वेळी एका मोटारसायकल स्वाराची दुचाकी खड्ड्यात अडकून अपघात झाला असल्याचेही सांगण्यात आले.पाच-सहा वर्षांपूर्वी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून या रस्त्याचे काम करण्यात आले होते तर आमदार गिरीश महाजन यांनी या रस्त्याचे भूमिपूूजन केले होते. मात्र या रस्त्यावरील पुलांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष दिल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
जामनेर तालुक्यात पुलाचा पाईप फुटल्याने रस्ता झाला बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 5:38 PM
तोंडापूर येथून जवळच असलेल्या मांडवे बुद्रूक ते ढालगाव दरम्यान पुलाचा सिमेंट पाईप फुटून मोठा खड्डा पडल्याने वाहनांना ये जा करण्यासाठी कसरत करत करावी लागत आहे.
ठळक मुद्देमांडवे-ढालगाव रस्त्यावरील घटनावाहनचालकांना करावी लागतेय कसरत