चाळीसगाव: 21- चाळीसगाव शहरापासून दोन कि.मी अंतरावरील दक्षिणेला असणा-या औट्रम (कन्नड) घाटात रविवारी झालेल्या धुवाँधार पावसामुळे पुढे आठ कि.मी. अंतरावर म्हसोबा मंदिराच्या अलिकडे रस्ताच खचला आहे. यामुळे घाटातील वाहतुक रविवारी रात्री आठ वाजेपासून थांबविण्यात आली आहे. रविवारी चाळीसगाव परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. एकाच दिवशी 58 मिमि पाऊस झाल्याची नोंद महसुल प्रशासनाने केली असून दुपारी जोरदार पाऊस झाल्याने हा रस्ता खचला. रस्ता खचल्याचे लक्षात आल्यानंतर चाळीसगाव वाहातुक शाखेने पाहणी करुन वाहतुक थांबवली, अशी माहिती शाखेचे प्रमुख सुरेश शिरसाठ यांनी दिली. ज्या ठिकाणी रस्त्याचा भाग खचला तेथे खाली खोल दरी आहे. नागद व नांदगावमार्गे वाहतुकदरम्यान कन्नड घाटातील वाहतुक थांबविल्याने नागदमार्गे म्हैसमाळ घाटातून वाहने औरंगाबादकडे जात आहेत. औरंगाबाद कडून येणारी वाहनेही नांदगाव व नागद मागार्ने चाळीसगाव शहरात येत आहेत. धुळे- सोलापुर हा राष्ट्रीय महामार्ग क्र. 211 होता. या महामार्गाचे नॅशनल हायवेकडे हस्तातर झाले असून सहा महिन्यापूर्वी कन्नड घाटातील रस्त्याचे काम झाले आहे. पावसाने रस्ता खचल्याने त्याच्या कामाबाबतच प्रश्ननिर्माण झाले आहे. वाहतुक सुरळीत होण्यासाठी एक ते दिड महिना लागणारघाटात रस्त्याच्या कडेला असणारी भिंतच रविवारी झालेल्या पावसाने कोसळली. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाने माती वाहून गेल्याने रस्ता खचला. सद्यस्थितीत ओलावा असल्याने भिंत बांधणे लगेच शक्य नाही. या कामासाठी एक ते दिड महिन्याचा कालावधी लागणार असून तोवर कन्नड घाटातील वाहतुक बंद असणार आहे, अशी माहिती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण औरंगाबाद विभागाचे प्रबंधक महेश पाटील यांनी लोकमत शी बोलतांना दिली.
कन्नड घाटातील रस्ता खचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:51 PM
वाहतुक थांबवली, पावसाचा परिणाम
ठळक मुद्देनागद व नांदगावमार्गे वाहतुक सुरुघाटातील वाहतुक सुरळीत होण्यासाठी एक ते दिड महिना लागणार