चाळीसगाव: तालुक्यात ग्रामीण भागात टाकळी प्र.चा., जामडी व सायगाव येथे कोरोनाचे प्रत्येक एक रुग्ण आढळुन आले आहेत. मात्र चाळीसगाव शहरात एकही रुग्ण आतापर्यंत नव्हता. परंतू शहरातील तहजीब उर्दु हायस्कुल परिसरात एका ५६ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाकडून हा संपूर्ण परिसर कटेन्मेंट झोन म्हणून घोषीत केला आहे.शहरातील तहजीब उर्दु हायस्कूल परिसरात बुधवारी सकाळी १० वाजता प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसिलदार अमोल मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देवराम लांडे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. बी.पी.बाविस्कर, शहर पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड, यांनी परिसराची व बाधित महिलेच्या घराची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी सदर एरिया कंटेन्मेंट झोन म्हणुन घोषित केला. या महिलेच्या परिवारातील महिला, पुरुष व लहान मुले मिळून १४ ,या महिलेने उपचार घेतलेले शहरातील ३ खाजगी डॉक्टर्स व त्यांचे ३ कंपाऊडर असे एकूण २० संशंयितांना चाळीसगाव येथील कोविड सेंटर येथे क्वारंटाईन करण्यात आले असुन त्यांचा स्वॅब घेऊन जळगाव येथे पाठविला आहे.ही महिला चाळीसगाव शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत होती. तिचा त्रास वाढल्याने तिला पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले होते. तेथे घशाचे नमुने घेतल्याने मंगळवारी रात्री उशिरा त्या महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. या महिलेवर शासकिय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे विलगीकरण कक्षात उपचार सुरु आहेत, असे डॉ.बी.पी. बाविस्कर यांनी सांगितले. ही बाधीत महिला पाचोरा तालुक्यातील वरखेडे येथे लग्न कार्यात गेली होती. तेथूनच तिला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता असल्याची चर्चा या परिसरात होती. यावेळी विश्वास चव्हाण, नगरसेवक शाम देशमुख, रामचंद्र जाधव, शेखर देशमुख, रोशन जाधव, जगदिश चौधरी, सुर्यकांत ठाकूर, गफुर पहेलवान, फकिरा मिर्झा, रफिक शेख, ईमरान शेख, अजिज खाटीक, असलम मिर्झा, सिराजऊद्दीन शेख, न.पा.चे अभियंता अमोल चौधरी, विजय पाटील उपस्थित होते.परिसर सीलहा परिसर सिल करण्यात येऊन न.पा.कर्मचाऱ्यांनी परिसरात व बाधित महिलेच्या घरात जंतुनाशकाची फवारणी केली. तसेच आरोग्य विभागामार्फत संपूर्ण परिसराची स्क्रिनिंग करण्यात आली. बिनधास्तपणे नागरिकांचा वावर असलेला हा परिसर महिला बाधित असल्याने बुधवारी निर्मनुष्य दिसुन आला. या परिसरातील नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आन
चाळीसगाव येथील तहजीब उर्दू हायस्कूल परिसरातील रस्ते सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 8:15 PM