फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : येथील पोलीस ठाण्यात ‘बेटी बचाओ बेटी पढावो’ यावर लक्षवेधी असे पथनाट्य सादर करण्यात आले. यात शिक्षणासाठी मुलींना येत असलेल्या अडचणी व कॉलेजमध्ये शिकत असताना रोडरोमिओ यांचा त्रास याला कोणतीही भीक न घालता निर्भयपणे पोलिसांकडे तक्रार करायला पाहिजे. यासाठी मुलींनी निर्भयपणे पोलिसांकडे तक्रार केली पाहिजे, असा संदेश देण्यात आला. मुुलगी शिकली तर समाजाची पर्यायाने देशाची प्रगती होईल, असेही या पथनाट्याच्या माध्यमातून बिंबविण्यात आले.बेटी होणे गुन्हा आहे का?लाडका लाडकी एक समान शिक्षण होवो याबाबत भूषण पाटील, इंडियन वारीयल जे.टी.महाजन पॉलिटेक्निक ग्रुप या मुलांनी कार्यक्रम सादर केला. भूषण पाटील यांनी कार्यक्रमाची सुरुवात देशभक्तीपर गीतांनी केली. कार्यक्रमात स्त्री भ्रूण हत्या, तरुणीवर होणारे अॅसिड हल्ले, सुनेवर होणारे अत्याचार अशा विविध विषयावर प्रबोधन करण्यात आले. कार्यक्रमाला अरविंद राठोड यांचे सहकार्य लाभले. पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या कार्यक्रमात पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग, स.पो.नि.दत्तात्रय निकम, भाजपा महिला आघाडी उपाध्यक्ष संगीता चौधरी, जयश्री चौधरी, योगेश सोनवणे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.वेटलिफ्टिंग प्रशिक्षक तथा फैजपूर पोलीस कॉन्स्टेबल योगेश महाजन यांनी रावेर शहरत आतापर्यंत शंभरावर वेटलिफ्टिंग खेळाडू तयार केले आहे. यात योगेश महाजन यांनी प्रसिद्धी माध्यमातून दूर राहत आपले कार्य सुरू ठेवले. मागील १५ दिवसांपूर्वी खेलो इंडिया खेलोमध्ये अभिषेक महाजन याने संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक मिळविला आहे. यासाठी त्याला वार्षिक आठ लाखाची शिष्यवृत्ती मिळाली आहे. याचे संपूर्ण श्रेय त्याने आपले प्रशिक्षक पो.कॉ.योगेश महाजन याला दिले आहे. या संपूर्ण कार्याची दाखल घेत त्याचे प्रजासत्ताक दिनी पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग, स.पो.नि दत्तात्रय निकम यांनी सर्व पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत योगेश महाजन यांचा सत्कार केला.
फैजपूर येथे पथनाट्याने वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 9:28 PM
फैजपूर येथील पोलीस ठाण्यात ‘बेटी बचाओ बेटी पढावो’ यावर लक्षवेधी असे पथनाट्य सादर करण्यात आले.
ठळक मुद्दे बेटी बचावो : बेटी पढावो अभियानमुलगी शिकली तर देश प्रगत होईल-पथनाट्यातून दिला संदेश