जामनेर : गांधी चौकापासून जुना बोदवड नाक्यापर्यंतच्या रस्त्याच्या एका बाजूचे डांबरीकरण पालिकेकडून नुकतेच करण्यात आले. या रस्त्यावर प्रवासी व मालवाहू रिक्षा तसेच अवजड वाहने थांबत असल्याने वाहतूक बंद असते. यामुळे या भागातील दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने अतिक्रमण काढण्याची मागणी नागरिकांनीउपनगराध्यक्ष प्रा.शरद पाटील यांच्याकडे केली. या भागातील शेख वाहिद, शेख वसीम, शेख सलीम, शेख इसरार व शेख नजीमुद्दीन यांनी बुधवारी प्रा. पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या २० वर्षात यारस्त्याच्या दुरुस्तीचे काम चार वेळा करण्यात आले व त्यावर मोठा खर्च झाला. मात्र रस्त्यावरील अतिक्रमणामुळे नागरिकांना उपयोग होत नाही. अतिक्रमण काढण्याबाबतपालिकेची उदासीनता कायम आहे.
आमदार गिरीश महाजन, नगराध्यक्ष साधना महाजन व मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करू. - प्रा.शरद पाटील, उपनगराध्यक्ष, नगरपालिका, जामनेर