जळगाव : शहर आणि परिसराला शुक्रवारी रात्री दोन तास पडलेल्या मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. विजांचा लखलखाट अन् ढगांच्या गडगडाटासह पडलेल्या या पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले तर पिंप्राळा अन् जळगाव शहराला जोडणाऱ्या बजरंग बोगद्यात गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांना पिंप्राळा रेल्वेगेटकडून वळसा घालून वाहने हाकावी लागत होती.शुक्रवारी रात्री पावसाला सुरुवात झाली अन् सुमारे दोन तास हा पाऊस धो धो कोसळला. त्यामुळे रस्तेही निर्मनुष्य होऊन गेले. रस्त्यावरील वीजपुरवठा अन् त्यानंतर घरगुती वीजपुरवठाही खंडित झाला होता. दरम्यान, दोन तासाच्या या पावसामुळे शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. गणेश कॉलनी, गोलाणी मार्केटसमोरील रस्ता, पिंप्राळा रोड आदी महत्वाच्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. त्यामुळे अनेकांनी पिंप्राळा गेटव्दारे येणे जाणे पसंत केले. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम कॉम्प्लेक्स समोरील रस्त्यावर तर बºयाच प्रमाणात पाणी साचले होते.उपनगर असलेल्या पिंप्राळ्यातील पिंप्राळा-हुडको रस्त्यावर चिखल झालेले होते़ शनिवारी सकाळी पायी चालणाऱ्यांना रस्त्यावरून वाट काढत असताना चांगलीच कसरत करावी लागली़ तर गटारीतील घाण रस्त्यांवर आल्यामुळे दुर्गंधीही पसरलेली होती़बजरंग बोगद्यामध्ये गुडघाभर पाणी साचलेले असतानाही एका दुचाकीस्वाराने अतिउत्साहाच्या भरात दुचाकी या बोगद्यात घातली अन् मोठ्या पाण्यात ती फसून गेली. दुचाकी रुतून बसल्याने हा दुचाकीस्वार अक्षरश: रडकुंडीला आला. अखेरीस त्याठिकाणी असलेल्या नागरिकानी अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर ही दुचाकी बाहेरकाढली.
पिंप्राळा अन् जळगाव शहराला जोडणाºया बजरंग बोगद्यामध्ये जवळपास गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे हा मार्गच बंद झाला होता. पिंप्राळा मार्गावरही काही ठिकाणी खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने तारेवरची कसरत करतच वाहने हाकावी लागत होती.दरम्यान, आशाबाबा नगरातील श्यामराव नगरात मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले़ त्यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला़ दुसरीकडे रस्त्यांवरून वाहणारे पाणी एका प्लॉटच्या ठिकाणी साचत होते़ त्याठिकाणी पाण्याचे तळे साचल्यामुळे पार्किंग केलेली कार त्यात अर्धी बुडालेली होती़ अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक अर्धिअधिक कमी झाली होती.रात्रीच्या पावसात तीन ठिकाणी विज खांब कोसळलेजळगाव : शुक्रवारी रात्री झालेल्या जोरदार वाºयासह मुसळदार पावसामुळे शहरात तीन ठिकाणी विद्युत खांब कोसळले. तर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या विज तारांवर पडून तारा तुटल्याची घटना घडली.आशाबाबा नगरातील वाटिका आश्रम, रिंगरोड व निमखेडी शिवारात असे एकूण तीन ठिकाणी विद्युत खांब कोसळले. तसेच रिंगरोड, निमखेडी शिवार, शिवाजीनगर या ठिकाणींही झाडांच्या फांद्या विद्युत तारांवर कोसळल्यामुळे तारा तुटण्याच्या घटना घडल्या. घटनेची माहिती मिळताच कार्यकारी अभियंता संजय तडवी यांनी संबंधित कर्मचाºयांना तात्काळ विद्युत खांब उचलण्याचे व विद्युत तारा जोडण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानुसार पाऊस थांबल्यानंतर महावितरण कर्मचाºयांनी रात्री उशिरापर्यंत विद्युत खांब उचलण्याचे व विज तारा जोडणयाचे काम केले. त्यानंतर विज पुरवठा सुरळीत झाला असल्याचे तडवी यांनी सांगितले.जिल्ह्यात १५३ मि. मी. पावसाची नोंद-गेल्या १३ दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने शुक्रवारी रात्री जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. शुक्रवारी जिल्ह्यामध्ये एकाच दिवसात १५३.५८ मि.मी. पावसाची नोंद झाली असून यामध्ये सर्वाधिक ४३.२८ मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात २६ जून अखेर २४.२२ टक्के पाऊस झाला आहे.-जळगाव तालुक्यात सर्वाधिक ४३.२८ मिलीमीटर व त्याखालोखाल चोपडा तालुक्यात २९.२८, धरणगाव तालुक्यात २२.६०, यावल तालुक्यात १७.११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.