शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
3
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
4
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
5
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
6
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
8
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
9
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
10
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
11
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
12
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
14
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
16
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
17
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
18
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
19
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!

चाकूचा धाक दाखवून व्यावसायिकाला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 8:27 PM

जळगाव : मी या एरियाचा दादा आहे, असे म्हणत राहूल सुरेश हटकर (रा.हरिविठ्ठल नगर) याने अग्रवाल चौकात चाकूचा धाक ...

जळगाव : मी या एरियाचा दादा आहे, असे म्हणत राहूल सुरेश हटकर (रा.हरिविठ्ठल नगर) याने अग्रवाल चौकात चाकूचा धाक दाखवून अनेकांकडून पैसे लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, मंगळवारी गुन्हा दाखल झाल्यानंतर राहूल याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयाने चार दिवासाची पोलीस कोठडी सुनावली.याबाबत रामेश्वरलाल बन्सीधर सैनी (४५, रा. राजस्थान, ह.मु. जिजाऊ नगर जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,अग्रवाल हॉस्पिटलजवळ बालाजी पॉवर टूल नावाचे तीन वर्षांपासून दुकान आहे. २४ आॅगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास राहुल सुरेश हटकर हा एका अनोळखी मुलासोबत सैनी यांच्या दुकानात आला. रामेश्वरलाल यांना धमकावत ५०० रुपयांची मागणी केली. यावर सैनी यांनी नकार दिल्याने राहुल हटकरने शिवीगाळ करून मी या एरियाचा दादा आहे असे म्हणत चाकूचा धाक दाखविला, त्यामुळे सैनी यांनी घाबरुन खिश्यातील २०० रुपये दिले. गेल्या आठदिवसांपुर्वी देखील घडला होता.इतरांकडूनही लूटयाच पध्दतीने संशयित राहुल हटकर याने चाकूचा धाक दाखवत प्रकाश छत्रमल राठी रा. वाघनगर यांच्याकडून १ हजार रुपये, सुरेशकुमार सैनी यांच्याकडून ४ हजार, किशोर रामगोपाल प्रजापत यांच्याकडून १० दिवसांपुर्वी ४०० रुपये घेतले तर जगदीश प्रसाद सैनी व छगन श्रीरामचंद्र सैनी यांना सुध्दा चाकूचा धाक दाखवून पैशाची मागणी केली होती. वेगवेगळ्या नागरिकांकडून धमकावून ६ हजार १०० रुपये त्याने जबरीने लुटले आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर हटकर याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्या.शेख यांनी चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव